गरिबी आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या ‘भावड्या’ चित्रपटाची शूटिंग सुरू
दि १४ / ०९/२६ : चणेगांव ( प्रतिनिधी ) पाथरे बुद्रुक येथे मराठी चित्रपट चे चित्रीकरणास प्रारंभ .गरिबी, संघर्ष, समाजाचे टोमणे आणि जिद्दीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका गरीब मुलाची हृदयस्पर्शी कथा मांडणाऱ्या ‘भावड्या’ या मराठी चित्रपटाचे शुभमुहूर्त आणि शूटिंगचा प्रारंभ पाथरे चनेगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
‘भावड्या’ हा चित्रपट एका गरीब मुलाच्या आयुष्याचा संघर्ष मांडणारा असून, गावातील लोकांच्या उपहासाचा आणि हाल-अपेष्टांचा सामना करत तो स्वतःची वाट कशी निर्माण करतो, याची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. गरिबी, सामाजिक विषमता आणि जिद्दीची ताकद यांचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
चित्रपटाचे निर्माते ज्ञानदेव शिंदे व प्रमोद पंडीत यांनी सांगितले की, ‘भावड्या’ ही केवळ काल्पनिक कथा नसून समाजातील अनेक गरीब कुटुंबांच्या वास्तव आयुष्याचे प्रतिबिंब आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मराठी चित्रपटाची लोकेशन चनेगाव,
पाथरे बुद्रुक या परिसरात सुरू आहे,
या चित्रपटात सिद्धी गाडेकर, अबोली बंगाळ, नीता कांबळे, तृप्ती निर्मळ, प्रसन्न जोशी, ज्ञानेश्वर थोटे, ज्ञानदेव शिंदे, अनिल गंगावणे, प्रथमेश केदार, रागिणी चिखलकर, प्रकाश डुकरे आणि भीमा अलोट हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे छायांकन गणेश तुरकणे, दिग्दर्शक विशाल बर्डे ,करीत आहेत. या चित्रपटाचे मुख्य भूमिकेत अभिनेता व दिग्दर्शक प्रमोद पंडीत म्हणाले की, हा सिनेमा प्रेक्षकांना हसवेल, रडवेल आणि विचार करायला भाग पाडेल. भावना, नाट्य, संघर्ष आणि सिनेमॅटिक थरार यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटातील कथानक, वास्तववादी मांडणी आणि सामाजिक संदेश यामुळे ‘भावड्या’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत नवा अध्याय लिहील, असा विश्वास संपूर्ण चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला असून लवकरच नियमित शूटिंगला सुरुवात होणार आहे.








