ग्रामीण युवक शेतकर्यांनी शेती ला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसायकडे वळावे -डॉ . क्षितिज घुले
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मधुकर केदार
अल निनो च्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेळीपालन व्यवसाय करावा -डॉ . क्षितिज घुले
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव – ने येथे आधुनिक शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन विषयावर – ग्रामीण युवक व युवती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
दहिगाव-ने, ता. शेवगाव : श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे दिनांक ७ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ५ दिवसीय आधुनिक शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन विषयावर ग्रामीण युवक व युवती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेळीपालनामधील मधील आधुनिक तंत्रज्ञान बद्दल केव्हीक शास्त्रज्ञानी, महाराष्ट्र पशू सवर्धन विभाग व जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील, मा. आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील तसेच डॉ. क्षितीज घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-नेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक यांच्या हस्ते झाले.यावेळी शेतकऱ्यांना विविध आधुनिक शेळीपालन तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कमी जागेत जास्त नफा देणारे शेळीपालन या विषयावर प्रगतिशील शेतकरी श्री. कमलेश वाघमोडे यांनी दैनंदिन व्यवस्थापणावर तसेच श्री. नितिन म्हस्के यांनी बोकड विक्री व्यवसायावर मार्गदर्शन केले. प्रती शेळी पाच वर्षीय उत्पादनातून ३१० किलो मांस उत्पादनाचे गणित आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय योजना या विषयावर डॉ. अमोल गायकवाड – पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आपले अनुभव व उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडले. चांगल्या जातीच्या शेळयांची निवड, करडू संगोपन व लागवडीच्या बोकड निवड पद्धतीमध्ये बदल करून काटेकोर पद्धतीने शेळीपालन केल्यास चांगले उत्पादन येऊ शकते याची खात्री डॉ. महेश पारखे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली.भारतीय कृषि अनुसंधान परिषद, कृषि विज्ञान केंद्र यांच्या प्रायोजकत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी डॉ,क्षितिज घुले सभापती, पंचायत समिती शेवगाव यांनी अलनिनो चा प्रभाव कमी करण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाची निवड करावी तसेच जास्तीत जास्त शेतकर्यांनी श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था द्वारे चालवण्यात येणार्या कृषि विज्ञान केंद्राचा लाभ घेण्याचे आव्हान केले . कार्यक्रमाचे नियोजन डॉ. चंद्रशेखर गवळी , पशुधन उत्पादन व्यवस्थापन विभाग प्रमुख यांनी केले, तर डॉ. एस. एस. कौशिक यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) इंजी. राहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील कृष्णा महिला स्वयांसहायता समूह हसणापुर ता. शेवगाव शेतकरी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. आधुनिक तंत्रज्ञान, शेळीपालनाचा अनुभव आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन यांचा संगम घडवून आणणारा हा ग्रामीण युवक व युवती प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला. हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी श्री. माणिक लाखे, श्री. सचिन बडधे, श्री. दहतोंडे नंदकिशोर यांनी सहकार्य केले.








