संभाजी बनसोडे यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी | गंगाधर कांबळे
जिगळा तालुका बिलोली येथील प्रामाणिक व कष्टाळू असे संभाजी मरीबा बनसोडे यांचे दिनांक 14 सप्टेंबर रोजी सहाच्या सुमारास अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांचा 15 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता जिगळा नंबर दोन येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात एकुलती एक मुलगी, जावई असा परिवार असून ते तलाठी रमेश बद्रापुरे हंगरगेकर यांचे सासरे आहेत .








