शालेय वुशू स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट चे 3 विद्यार्थी राज्यस्तरावर…
उज्वल जयस्वाल | जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दिनांक २० / ०९/ २६/ राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील 3 विद्यार्थ्यांनी विभागीय शालेय वुशू स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या विजयामुळे त्यांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. 19 सप्टेंबर रोजी अमरावती येथे शालेय विभागीय वुशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर च्या 6 विद्यार्थ्यांनी बुलढाणा जिल्हाचे प्रतिनिधित्व करत पैकी 3 विद्यार्थ्यांनी विजयी होत राज्यस्तरावर झेप घेतली. यात मुलांमध्ये 19 वर्षे वयोगटात अदित्य जिवन सिरसाट व विशाल सुनील गीरी यांनी विजय मिळवला तर मुलींमध्ये 19 वर्षे वयोगटात जानवी संतोष भिवटे हिने विजय मिळवला. सर्व खेळाडूंनी आपल्या तिन्ही सामन्यात चमकदार कामगिरी करत व प्रतीस्पर्धी स्पर्धकांना नमवत विजय मिळवला. या विजयामुळे तिघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर शे. काशीफ शे कलीम, करन चिकटे व प्रेम ठाकूर यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.
विजेते स्पर्धकांना शुभेच्छा देत असतांना संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके म्हणाले कि, या दमदार कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. साधारणपणे क्रीडा स्पर्धांमध्ये शहरी खेळाडूंचा बोलबाला बघायला मिळतो. ग्रामीण खेळाडू काहीसे मागे पडलेले दिसतात. मात्र मला सांगायला आनंद होतो की, ग्रामीण भागात असूनही जिजाऊ ज्ञान मंदिर स्पोर्ट्स हब म्हणून ओळखले जाते. संस्थेने खेळ पुरक वातावरण, पुरेशा सोयीसुविधा, तज्ञ प्रशिक्षक उपलब्ध केले आहेत. याचा लाभ घेऊन आमचे खेळाडू नैसर्गिक क्षमतेच्या जोरावर कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. गतवर्षी वुशू, तायक्वांडो, कराटे, युनिफाईट, कुस्ती व इतर खेळ प्रकारात 27 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली होती.
यामध्ये पाच पदक ही मिळाले होते. शाळेने दोनवेळा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक सुद्धा मिळवलेले आहे हे विशेष. विजेत्या खेळाडूंना राज्यस्तरावर सुद्धा यश मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा.
या यशासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक भूषण सिरसाट यांनी मेहनत घेतली. तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








