देगलूर येथील गोर बंजारा तीज महोत्सवात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हॉईस मॅसेज द्वारे संवाद ..
विशाल पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही .
बातमी सम्राट | संघपाल मदने | देगलूर | दि.२२/०९/२६/
देगलूर येथे आयोजित गोर बंजारा तीज महोत्सवात तीन हजारांपेक्षा जास्त माता, भगिनी आणि बंधूंनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. पारंपारिक बंजारा पेहरावात उपस्थित असलेल्या महिलांमुळे संपूर्ण कार्यक्रम परिसर बंजारा संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित राहणार होत्या; मात्र नांदेड जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा फोन आल्यानंतर त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
व्हॉईस मेसेजद्वारे दिलगिरी आणि भाऊ-बहिणीच्या नात्याची ग्वाही
ऐनवेळी दौरा रद्द झाल्याने राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्हॉईस मेलद्वारे संयोजक टीम आणि उपस्थित समाज बांधवांना भावूक संदेश पाठवला. कार्यक्रमास वैयक्तिकरीत्या उपस्थित राहू न शकल्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या संदेशात त्या म्हणाल्या, “विशाल भाऊ हा माझा छोटा भाऊ आहे. एक मोठी बहीण म्हणून मी कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन.”
राज्यमंत्री बोर्डीकर यांचा हा संदेश राजश्री आडे यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित समाज बांधवांना ऐकवला. तसेच त्यांनी बंजारा समाज एकजूट राहण्याचे आवाहन करत तीज उत्सवाचे महत्त्व विशद केले.
स्थानिक समस्यांवर प्रास्ताविकातून प्रकाश पाडत
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सौ. सुरेखा विशाल पवार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात देगलूर तालुक्यातील व शहरातील तांड्यांच्या विविध समस्या सखोलपणे मांडल्या. तसेच आगामी काळात या सर्व समस्या मार्गी लावल्या पाहिजेत, असा ठाम आग्रहही धरला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संयोजक विशाल पवार यांनी मानले.
दिग्गजांची उपस्थिती आणि उत्तम नियोजन लाभात,
या महोत्सवास सेवानिवृत्त इंजिनिअर चंद्रकांत नाईक, गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, बंजारा क्रांती दल अध्यक्ष देविदास राठोड, माजी समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, बंडू महाराज दापकेकर, डॉ. पूजा गायकवाड, नगरसेवक नंदू शाखावार, अर्जुन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राज पवार व रामराव चव्हाण यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बालाजी जाधव, सचिन चव्हाण, दिलीप चव्हाण, रवी चव्हाण, बजरंग चव्हाण, आकाश जाधव, प्रकाश राठोड आदींनी यशस्वीरीत्या पार पाडले.








