किनवट मध्ये गणेश विसर्जना साठी पैनगंगा नदीत इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी…
निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बातमी सम्राट | मार्कंडेय सिरामवार | किनवट | दि.२२/०९/२६/
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किनवट शहराची जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीपात्रात पाणी साठवण्यासाठी नजीकच्या इसापूर धरणातून तात्काळ पाण्याचा विसर्ग करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ‘युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे’ करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन 21 सप्टेंबर 2026 रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.
यंदा किनवट व परिसरात अपुरा पाऊस पडल्यामुळे पैनगंगा नदीपात्रात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे.
अनंत चतुर्दशीला घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात पुरेशी पाणीपातळी उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
नदीत पाणी नसल्यामुळे गणेश भक्तांच्या भावना दुखावण्याची तसेच स्वच्छता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक व धार्मिक भावनांचा आदर करत पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणातून विसर्जनाकरिता पाणी सोडण्यात यावे. तसेच आगामी 25 सप्टेंबरपर्यंत नदीपात्रात पाणी टिकून राहण्यासाठी येथील जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे फाटक बंद करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश नगरपरिषद प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा समारंभ असल्याने लोकांच्या भावना याशी जोडलेले आहेत त्यामुळे एखाद्या मूर्तीची विटंबना झाल्यास शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे शिवाय शहरात सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बसविण्यात आलेल्या मूर्तींची उंची आठ ते दहा फूट असल्यामुळे सदर मूर्ती पाण्यात बुडून विरघळून जाण्यापेक्षा आहे परंतु यामध्ये कुठली हाय गैय झाल्यास शहरातील वातावरण मोठ्या प्रमाणात बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच उपाययोजना करून संबंधित प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे
या निवेदनावर तालुका अध्यक्ष मार्कंडेय विश्वनाथ सिरामवार, तालुका सचिव नागभूषण येंबरवार, शहराध्यक्ष प्रशांत,
सातुरवार, तालुका उपाध्यक्ष शेख मोईन, ता. सहसचिव किशोर बोलेनवार, गंगाधर कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








