शिंदे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करा बिलोली ग्राम रोजगार सहाय्यक संघर्ष समितीचा कामावर बहिष्कार..
बातमी सम्राट | मारोती एडकेवार | जिल्हा प्रतिनिधी नांदेड |२६/०९/२६.
नांदेड :बिलोली राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने ग्राम रोजगार सहाय्यकाना लागु करण्यात आलेल्या दि.०3 ऑक्टोबर २०२४ रोजी निर्णयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून २४ महिन्यांचे प्रलंबित मानधन डीबीटी द्वारे रोजगार सहाय्यकांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी बिलोली तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेनी दि. २८ सप्टेंबर २०२६ पासुन काम बंद आंदोलन पुकारले आसुन सदर आंदोलनाच्या ईशा-यांचे निवेदन आज दि. २५ सप्टेंबर रोजी तहसिलदार गजानन शिंदे व पंचायत समिती गटविकास अधिका-यांना देण्यात आले.
यावेळी ग्राम रोजगार सहाय्यक संघांचे तालुकाध्यक्ष अनिल नरवाडे कार्याध्यक्ष बालाजी नरहरे, उपाध्यक्ष गणेश गिरगावकर, गंगाधर डोंगरे,सचिव सय्यद ईसा अमिर, शिलानंद बुध्देवार,परमेश्वर वाघमारे,आर.एल.शिंदे,देवराव शिंदे,गुलाब नरवाडे, जयदिप गावंडे,गोविंद नरवाडे,सदानंद देवकरे,सुरेश शिंदे, रवी जाधव,विजय पवार,दिलीप देवकरे,पि. एल. रामटक्के,जी. बि. गायकवाड,आर.एम. वाघमारे,हाणमंत मेडगुळे, साहेबराव,आनंदा पतंगे, भाऊराव मोरे,बळीराम साळुंके, दिंगबर बोगरे,ज्योतिबा गायकवाड,अविनाश किनाळकर,जी. एस. जाधव, सुरनर जयसिंग,काबळे रावसाहेब,व्हि.आर. वाघमारे,लतिफ ईनामदार,एकंबे विठ्ठल,किसन कांबळे,भालेराव बालाजी,बळीराम शेळके याच्यासह अनेकांच्या स्वाक्ष-यां आसलेले निवेदन देण्यात आले.








