रायपूर प्रतिनिधी | सागर इंगळे
रायपूर : रायपूर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून गावाला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेख राजू शेख बुढन, मोहम्मद साबीर मोहम्मद असमान, मोहम्मद फयाज व मोहम्मद एजाज यांनी केली आहे.
रायपूर गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी गावातील नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.
अन्यथा रिकाम्या भांड्यांसह आंदोलन!
रायपूर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास येणाऱ्या काळात ग्रामस्थ रिकामी भांडी घेऊन संबंधित कार्यालयात आंदोलन करतील, असा इशारा शेख राजू शेख बुढन, मोहम्मद साबीर मोहम्मद असमान, मोहम्मद फयाज व मोहम्मद एजाज यांनी दिला आहे.
आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन रायपूर गावातील पाणीप्रश्न कधी सोडवणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








