टेंभुर्णी प्रतिनिधी – अमोल मदने
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ आणि माढा विधानसभेचे भाग्यविधाते, माजी आमदार मा. श्री. बबनरावजी दादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळाच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमाचे नेतृत्व माढा पश्चिम मंडळ तालुकाध्यक्ष श्री. योगेश बोबडे (बाबाराजे) यांनी केले.
यावेळी टेंभुर्णी आणि परिसरातील शेकडो तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत युवकांनी सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबिरास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








