पुणे सोलापूर महामार्गावर कामत हॉटेलच्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत कामत हॉटेलच्या जवळ एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दत्तात्रय भगवान वैद्य असे आहे.
हि घटना दि १७/०८/२०२६ रोजी पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे यवत गाव हद्दीतील कामत हॉटेलच्या जवळ घडली असून सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळी यवत पोलीसांनी धाव घेतली मयत व्यक्तीची चौकशी केली असता सदर व्यक्तीच्या मोबाईलच्या सिमकार्ड वरून पोलिसांनी तपास सुरू केला असता मयत व्यक्तीची बहिण व नातेवाईकांची ओळख मिळताच सदर अपघाताची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यवत पोलीस स्टेशन येथे नातेवाईक समक्ष हजर झाले दि १८/०८/२०२६ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी. संगिता कैलास काकडे वय ४३ वर्षे व्यवसाय शेती रा भांडेगाव ता बाशीं जि सोलापुर. यांचे फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन गुन्हा र.नं ८४७/२०२६ भा न्या सं कलम १०६ (१).२८१. १२५.(अ) (ब) मो वा का क १८४.१३४.१७७. प्रमाणे अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की मयत व्यक्ती भाऊ दत्तात्रय भगवान वैद्य व्यवसाय धंदा ड्रायवर त्याची पत्नी सारीका वैद्य, मुलगा ऋषिकेश, मुलगी नदीनी असे राहण्यास आहे फिर्यादी यांच्या भावाची १६ टायर सिर्मट बलकर ट्रक असुन तो सोलापुर मुंबई लाईनला चालवतो.ता १४/०८/२०२६ रोजी भाऊ दत्तात्रय भगवान वैद्य हा त्याच्या मालकीची अशोक लेलंड १६ टायर सिमेंट बलकर ट्रक नं एम एच १३ ई सी ४३२९ हा सोलापुर येथुन मुंबई येथे खाली करण्यासाठी गेला होता.
त्या नंतर ता १६/०८/२०२६ रोजी मुंबई येथुन निघुन वाघोली, पुणे येथे ता १७/०८/२०२६ रोजी सायंकाळी ५: वाजे दरम्यान गाडी खाली केली व तेथे तो नो इंट्री मुळे थांबला होता. त्यानंतर तो रात्री १०:३० वाजे सुमारास वाघोली येथुन सोलापुर येथे जाण्यासाठी निघाला पुणे सोलापुर हायवे सोलापुर दिशेकडे जात असताना मौजे ययत गावचे हद्दीत हॉटेल कामतचे जवळ त्याने त्याच्या ताब्यातील ट्रक रोडच्या साईटला पार्क केला व काहीतरी आणण्यासाठी खाली उतरुन रोड क्रॉस करत असताना पुणे बाजुकडुन येणारे कोणत्यातरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने अविचाराने चालवुन फिर्यादीचा भाऊ नामे दत्तात्रय भगवान वैद्य यास जोरात धडक दिल्याने त्यास कीरकोळ व गंबीर दुखापत होवुन त्याच्या मृत्युस कारणीभुत ठरला आहे. तसेच अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे. म्हणुन फिर्यादीची अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे असे नमूद करण्यात आले आहे. यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांचे मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार कदम तपासी अंमलदार मसपोनि गोसावी पुढील तपास करीत आहेत.








