कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मुडझा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३०५ नागरिकांनी घेतला लाभ!
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आस्था रुग्णालय यांचा संयुक्त सामाजिक उपक्रम
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली (ब्रह्मपुरी) : दि. २१ ऑगस्ट २०२६, शेतकरी, कष्टकरी व कामगारांचे नेते कॉम्रेड विनोदभाऊ झोडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मौजा मुडझा येथे भव्य मोफत रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि आस्था रुग्णालय, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आवळगाव, हळदा, बोडधा, कुडेसावली, मुडझा, बल्लारपूर, पद्मापूर, कोसंबी, आक्सापूर, पवनपार, बेलगाव, मुरपार, सायगाव, वांद्रा, डोरली, चिचगाव, बरडकिन्ही, आकापूर, करोली, खानाबाद यासह अन्य गावातील एकूण ३०५ नागरिकांनी आपली मोफत तपासणी व नोंदणी करून या सेवेचा लाभ घेतला.
शिबिराची सुरुवात मुडझा येथील ग्रामपंचायत सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मोलाचे मार्गदर्शन व सेवा: या आरोग्य शिबिरात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची कसून तपासणी केली आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. यामध्ये प्रामुख्याने: डॉ. विवेक बागडे (एम.डी. मेडिसिन – हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ) यांनी ताप, बीपी, शुगर, दमा, ॲलर्जी व किडनी विकारांची तपासणी केली.
डॉ. पंकज लाडके (MBBS, DA, FCCM – अतिदक्षता विभाग तज्ज्ञ व फॅमिली फिजिशियन) यांनी सामान्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले.
डॉ. महेश चनाप (M.S. सर्जन – कॅन्सर सर्जन) यांनी हर्निया, हायड्रोसील, गाठी व कर्करोगाशी संबंधित तपासणी केली.
डॉ. सचिन गिन्हेपुंजे (M.S. Ortho – अस्थिरोग व वातरोग तज्ज्ञ) यांनी संधिवात, फ्रॅक्चर, कंबर व मणक्यांच्या आजारांचे निदान केले.
डॉ. महेश कोपुलवार (B.A.M.S. आयुर्वेदाचार्य, आरमोरी) डॉ.चंद्रगिरीवार यांनी पारंपरिक व आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य सल्ला दिला.
याशिवाय शिबिरात भोयर मेडिकलतर्फे रुग्णांना औषधांवर १५ टक्क्यांपर्यंत विशेष सवलत देण्यात आली. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्य व गरजू नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आस्था रुग्णालय कॉ. विनोद झोडगे यांनी उपस्थित डॉक्टरांनी सेवा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अमोल मानापुरे,बंडू कोटगले, दुधराम भोयर, गीता कोटगले, देविदास हुलके, आनंदराव तलानडे, पांडुरंग राऊत, मुखर झोडगे, डॉ. बर्वे, बी डी उरकुडे, मंगरू ठाकरे, गोलू दरवे, संतोष झोडगे, राहुल पांडव, शरद भानारकर, सुधाकर लोणारे, सुनील पाटील म्हशाखेत्री, चुनीलाल मोटघरे, परसराम ठाकरे, सदाशिव उंदिरवाडे यासह पक्षाचे कार्यकर्ते, आशा वर्कर, स्थानिक पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण मंडळी व सामाजिक कार्यकर्ते इंत्यादींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.








