टाकळीभान ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत जोरदार शाब्दीक चकमक व खडाजंगी
प्रतिनिधी : संदीप जाधव
टाकळी भान: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीथान येधील ग्रामपंचायतची ग्रामसभा दि. १९ ऑगस्ट रोजी पार पडली. रेशन, बसस्टैंड, या मुद्याभोवती तज्वल तीन तास सुरू असलेल्या या ग्रामसभेत शाब्दीक चकमक होवून याचे रूपांतर जोरदार खडाजंगीत झाले. परिणामी अपेक्षीत मुद्द्यावर सुटसुटीत चर्चा होणे गरजेचे होते. मात्र तसे न होता कुणाचाच कुणाला ताळमेळ लागेना. फक्त आरडाओरड, धांगडधिंग्यातच सदर ग्रामसभा वेगळ्या दिशेने भरकटली जावून कुठलीही साधक बाधक चर्चा न होता गदारोळातच गुंडाळली गेली. सुरुवातीला ग्रामसेवक भिंगारदे यांनी केलेले अहवाल वाचन तसेच तीन चार वक्त्याचे पाच ते सात मिनिटांचे मनोगत वगळता संपूर्ण ग्रामसभा ही गदारोळातच पार पडली. अनेकांना आपले प्रश्न मांडण्यास संधीही मिळाली नाही. संपूर्ण पाच वर्षाच्या ग्राम पंचायतीच्या कारभाराचे जसे चित्र ग्रामस्थांनी अनुभवले त्यास साजेशी अशीच ही शेवटची ग्रामसभा असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती सतरा सदस्य असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतची ग्रामसभा ही बुधवार दि.१९ रोजी पार पाडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कान्हा खंडागळे हे होते.
यावेळी व्यासपिठ राहुल पटारे, राजेंद्र कोकणे, सुप्रिया धुमाळ, भास्करराव कोकणे, अनिल बोडखे, नारायण काळे, शाखाअभियंता रगडे, यशवंत रणनवरे, आबासाहेब रणनवरे, तलाठी रूपाली रामटेके, संजय रणनवरे अविनाश लोखंडे आदी उपस्थित होते. या सदस्य मंडळाची ही शेवटची ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांना विकासकामा संदर्भात साधक बाधक व तपशीलवार चर्चा होईल याबाबत कमालीची उत्सूकता होती. मात्र या सर्व बाबींचा भ्रमनिरास होऊन फक्त आणी फक्त मनोरंजनाचा खेळच गावाला अनुभवयास मिळाला. ग्रामसेवक भिंगारदे हे अहवाल वाचन करत असतानेच त्यांना काही जणांकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला. जलदगतीने अहवाल वाचन आटोपून भिंगारदे हे बाजुला झाले.
तदनंतर भास्करराव कोकणे यांनी गेल्या पाच वर्षातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेर ओहले. या सदस्य मंडळाने कुठालाही विकास केला नसून फक्त आणी फक्त गलीच्छ राजकारण केले. त्यामुळे अशा गलिच्छ राजकारण करणायां जिनसा परत निवडून देवू नका असे आवाहन करून या ग्रामसभेतून काडता पाय घेतला. अनिल बोडखे यांनी अन्नसुरक्षा योजनेचा प्रश्न उपस्थित केले. तसेच आपल्या परिवाराच्या नावाच्या समावेशचा उल्लेख कसा झाला? याची विचारणा केली असता तुम्ही मागणी केल्याशिवाय नाव येत नाही असे उत्तर कान्हा खंडागळे यांनी दिल्याने बरही केा या दोघांमध्ये शाब्दीक बचाबाची झाली. ग्रामपंचायत कर्मचार्याचा पगार वाढविणे तसेच वाजारचा लिलाव रद्द करून कर्मचार्यामार्फत बाजारची वसूली
करण्याची मागणी बोडखे यांनी केली. बापूसाहेव शिंदे यांनी यावेळी अतिक्रमण नियमानुकूल करावे व घरकुलांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अन्यथा ग्रामपंचायात पुढे मी उपोषणास बसेल असा इशारा दिला. येथील व्यावसायीकांचे थोडेफार असलेले अतिक्रमण काढू नये. नाहक व्यापार्याना त्रास देवू नये असे मत रामभाऊ आरगडे यांनी मांडले. संजय रणनवरे यांनी बसस्टँडचा प्रश्न येधील गाव पुढार्याना सोडविता येत नसेल तर ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. हेमंत ओगले यांच्यापुढे मी कैफीयत मांडणार असल्याचे सांगून स्टैंडपरिसरात महिलांसाठी मुतारी बांधण्यात यावी अशी मागणी केली. यानंतर सुप्रिया धुमाळ महणाल्या की, मुली व महिला या गावात सुरक्षीत नाही. पाचा दस्तुरखुद्द अनुभव माला स्वतःला आला आहे. त्याचचरोबर टाकळीभान ग्रामपंचायचातीच्या मागील काही वर्षापूर्वीच्या सदस्य मंडळाचायतच्या कारभाराचावत तसेच यात्रेतील ऑर्केस्टा कार्यक्रम व ग्रामपंचायत जागा नावावर लेण्यावाचत प्रश्न विचारताच जोरदार खडाजंगीस सुरुवात झाली. पावेळी त्यांना उत्तर देताने उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, जुन्या सदस्य मंडळाने काय केल? याबद्दल तुम्ही आम्हांला का विचारता? त्याबद्दल आम्हांला माहीती नाही.
तसेच वाजेबद्दलचा संपूर्ण निर्णय हा यात्राकमि टीचा असून त्यात आमच्या संबंध नाही. चात्रेत तमाशा व इतर कार्यक्रम हे यात्रेचे अविभाज्य घटक असून त्याशिवाय यात्रेला शोभा नसल्याचे सांगीतले. तसेच वावेत लोककलेचे कार्यक्रम ठेवायचे की नाही याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली. यावेळी मोठ्धाप्रमाणात गदारोळ उडाला. तष्यल तीन तासामधील जवळपास दोन अडीच तास पाच गदारोळात ही ग्रामसभा पार पडली. ११ वाजेच्या दरम्यान सुरू झालेली ग्रामलभा दोन अडीचच्या सुमारास संपली, वाप्रसंगी अनेकांना प्रव मांडायचे होते. काही वक्त्यांना बोलायचे होते. मात्र या गदारोळामुळे त्यांना आपले विषय न मांडताच जावे लागले.
यप्रसंगी सुधिर मगर, अनिल दाभाडे, आप्पासाहेब रणनवरे, भाऊसाहेब पटारे, अनिल कोकणे, जाययोन खरात, सोमनाथ आरगडे, अक्षय कोकणे, मल्हार रणनवरे, बाबासाहेव तनपुरे, विशाल पटाते, कानीफनाध जाधव, प्रभाकर रणनवरे, दगाडू गायकवाड, एकनाथ पटारे, मधुकर गायकवाड मोठ्या संख्येने उपस्थित होते








