एटापल्ली तालुक्यातील नैनवाडीतील ड्रिलिंग कामाची चौकशी करा
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली (एटापल्ली) : दि. २५ ऑगस्ट २०२६, नैनवाडी परिसरात Sunflag Iron & Steel Company Limitedच्या Surjagad-6 Iron Ore Block अंतर्गत सुरू असलेल्या ड्रिलिंग कामांमध्ये मंजूर अटी-शर्तींचे उल्लंघन, वनसंपत्तीचे नुकसान व नवीन रस्त्यांच्या निर्मितीबाबत तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
याबाबत भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी एटापल्ली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
ड्रिलिंगसाठी लागू असलेल्या Zero Tree Felling अटीचे पालन झाले आहे का, झाडे व फांद्यांचे नुकसान झाले आहे का, तसेच नवीन रस्त्यांना आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, याची वन विभाग, महसूल प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाद्वारे स्थळपाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नैनवाडी परिसरातील वनसंपत्ती, पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केली.








