देवराष्ट्रे येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान हरवले झाडाझुडपात
एक दिवसही कोणी नाही राहिले; दुरुस्तीसाठी झालेला लाखोंचा खर्च वाया
देवराष्ट्रे : संदेश जाधव शासनाने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी मागील काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र, देवराष्ट्रे येथील पशुवैद्यकीय अधिका-यांचे व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधल्यापासून अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रतीक्षेत आहे. एकही अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी राहिला आलेला नाही. असे असतानाही मागील वर्षी कडेगाव पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने इमारत दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. देवीन इमारती अक्षरशः झाडाइझुडपांनी वेढल्या आहेत.
देवराष्ट्रे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात काही वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून सुसान दवाखाना तसेच अधिकारी व कर्मचान्यांसाठी निवासस्थानाचे बांधकाम केले आहे. याशिवाय भिंतीचे कुंपण करून हा परिसर बंदिस्त केला आहे. शासनाने या इमारतीवर लाखो रुपयांचा खर्च करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकरी व पशुपालकांना वेळेत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या या धोरणाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.








