भारत टॅलेंट सर्च प्रज्ञाशोध परीक्षा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली (आरमोरी) : गट साधन केंद्र (आयएसओ मानांकन) आरमोरी येथे दि.१३ ऑगस्ट २६ ला ऐज्युमिट एकेडमी व्दारा घेण्यात येणाऱ्या भारत टॅलेंट सर्च प्रज्ञाशोध परीक्षा- २६ स्पर्धेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष- पं.स. गटशिक्षणाधिकारी मा .दिपक देवतळे आरमोरी , उद्घाटक शिक्षण विस्तार अधिकारी – राजेश वडपल्लीवार प्रमुख पाहुणे पदविधर शिक्षिका भारती तागडे, करूणा बागेसर, सुनंदा गिरीपुंजे, सेलोटे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सुषमा रामटेके यांनी केले. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून त्यांना वंदन केले. सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकेमध्ये विनोद भांबोरे विषय साधन व्यक्ती यांनी भारत टॅलेंट सर्च परीक्षा सतत तीन वर्षापासून आपल्या तालुक्यात आयोजित करण्यात येत आहे, या परीक्षेमध्ये २०२३-२४ मध्ये १५४ विद्यार्थीनी परीक्षा दिली. सन २०२४-२४ मध्ये २८५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आणि सन २०२६-२६ मध्ये ७२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. सदरील परीक्षा ही इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून घेतली जाते. २९ मार्च २०२६ मध्ये सदर परीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी तसेच किसान विद्यालय वडधा या दोन केंद्रावर घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी ३० पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली होती. परीक्षेचे नियंत्रण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुदर्शना गेडाम आरमोरी यांच्याकडे होते.
दिपकदेवतळगटशिक्षणाधिकारी तसेच राजेश वडपल्लीवार शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दोन्ही परीक्षा केंद्रांना भेट देऊन परीक्षा व्यवस्थित सुरू असल्याचे निदर्शनास आले.
गुणवत्ता यादीमध्ये १३ विद्यार्थी कारमेल अकॅडमी आरमोरीचे, ७ विद्यार्थी पीएम श्री केंद्र शाळा वडधा, ६ विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसबी .इतर शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकंदरीत मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आल्याचे निदर्शनास आले.
विद्यार्थीच्या सत्कार प्रसंगी राजेश वडपल्लीवार यांनी ही स्पर्धा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी उत्तम संधी देणारे असल्याचे सांगितले.
हेमलता आखाडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठीही एक उत्तम मार्गदर्शक ठरली. विद्यार्थी पालक आशिष सेलोकर यांनी सदर परीक्षा बद्दल अभिप्राय देताना सांगितले की हे स्पर्धा परीक्षा उत्तम यासाठी आहे की विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून स्पर्धा परीक्षेमध्ये बसण्याची संधी प्राप्त करून देते त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर परीक्षा देताना हे उत्तम मार्गदर्शक ठरते त्यामुळे ह्या परीक्षेचे नियोजन करणाऱ्या आणि तालुक्याचे समन्वयक विनोद भांबोरे यांचे अभिनंदन करते. अध्यक्ष भाषणामध्ये दीपक देवतळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी सदर परीक्षेचे उत्तम नियोजन, पालकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिक्षकांचे सदर परीक्षा बद्दल सकारात्मक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांना भविष्यात लक्ष वेध निर्माण करण्यासाठी भारत टॅलेंट सर्च परीक्षा हि विद्यार्थ्यांना दिलेली उत्तम संधी होय. आणि या संधीचा फायदा येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी घेतल्याचे निदर्शनास येते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू तसेच पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद हे ह्या परीक्षेचे यशस्वी गमक असे म्हणायला हरकत नाही. ही परीक्षा विद्यार्थ्यांसोबत पालकांची पण असल्याचे देवतळे सरांनी अभिक्रियातून व्यक्त केले. जे विद्यार्थी यावर्षी तालुका स्तरावर प्राविण्य प्राप्त केले ते पुढील वर्षी जिल्हावर प्रावीण प्राप्त करतील जे विद्यार्थी जिल्हावर प्राविण प्राप्त केले ते राज्यावर प्राविण्य प्राप्त करतील यात शंका नाही.
यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आभार प्रदर्शन हेमंत कुमार बिसेन यांनी केले.
कार्यक्रमाला आयएसओ गट साधन केंद्र आरमोरी येथील सर्व कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग होता.








