रक्षाबंधनाच्या निमित्ताने कासुर्डीत माणुसकीचा धागा बांधला; कोडीदकर बहिणींनी निराधार विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा
प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता दौंड जिल्हा पुणे येथील दीपगृह बालनगरी निराधार वस्तीगृहातील विद्यार्थी मुलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून आनंद व्यक्त केला. जावजी बुवाची वाडी येथील तुकाराम कोडीदकर यांच्या कुटुंबातील सारीका कोडीदकर. व निशा आखाडे. दिशा आखाडे. या तीन मुलींनी रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त कासुर्डी येथील दीपगृह बालनगरीतील निराधार विद्यार्थी मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. या सामाजिक उपक्रमातून मानुसकीची बांधिलकी जपली आहे. विषमतेची दरी निकामी करुन लहान भावांना राखी बांधून माणवतेचा सुंदर संदेश दिला आहे.

यावेळी कोडीदकर व आखाडे कुटुंबातील बहिणींनी बालनगरीतील विद्यार्थ्यांसाठी स्वतः राख्या तयार करून आणल्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हाताच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधत त्यांच्याशी बहीण-भावाचे नाते जपले. जावजी बुवाची वाडी येथील गाव पोलीस पाटील तुकाराम कोडीदकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना लाडू खाऊचे वाटप करण्यात आले. या उदंड प्रेमळ उपक्रमाला विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आनंद व्यक्त केला.
बालनगरीतील विद्यार्थी आपल्या हालाकीच्या व कोटुंबीक परिस्थितीचा सामना करणाऱ्या व आई वडिलांच्या मायेपासुन दुरावलेल्या निराधार विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मोठ्या बहिणीला राखी बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. या भावनिक क्षणी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आपुलकीचे भाव स्पष्ट दिसून येत होते. नाती जोडण्यासाठी वंशावळ लागत नाही.
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे नाते जोडण्याचा दिवस आहे. तुकाराम कोडीदकर यांची कन्या सारीका कोडीदकर तसेच निश आणि दिशा या बहिणींनी केलेल्या या सामाजिक उपक्रमातून. निराधार विद्यार्थ्यांना आपलेपणाची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व हसरा चेहरा फुलला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, सण-उत्सव सामाजिक बांधिलकीने साजरे करण्याचा आदर्श कोडीदकर व आखाडे बहिणींनी घालून दिला आहे.








