राजापूरसह परिसरात व तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात.
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर सह परिसरात गेल्या एक महिन्याभरापासून पावसाने उघडी दिल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात पिके सुकून जात आहेत येवला तालुक्यातील पूर्व भाग निसर्गाच्या भरवशावर शेती केली जाते या भागात कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाहीत या भागात असलेल्या राजापूर सह परिसरात खरिपाच्या पेरणया झाल्यानंतर रिमझिम पाऊसामुळे कसेबसे पीके मोठी दिसायला लागली परतु आता पावसाने दडी मारल्यानंतर पिकाना आता सध्या पिकांना पाण्याची गरज असून पिके पाण्यावाचून शुकुनचालली आहेत निसर्गाचे ह्या लहरीपणामुळे शेतकरी वर्ग हातबल झाले आहे खरिपांच्या पेरणी झाल्यानंतर रिमझिम पावसावर पेरण्या झालयावर थोडेफार पीक मोठ्या झाले परंतु मुगाला शेंगा लागायची वेळ आली व पाऊस नाही बाजरीला फुलारा लागण्याची वेळ पाऊस नाही. मकाला बिटी लागण्याची वेळ पाऊस नाही, असी बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा फिटणार नाही.अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याने दुष्काळी परिस्थिती उद्भवली जाणयाची शक्यता आहेत त्यामुळे शेतकरी पुन्हा आणखीन कर्जाच्या घाईत जाणार आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपातील मका बाजरी, सोयाबीन,भुईमूग तूर,मुग, हे पिके संकटात सापडले आहेत व विहिरींना पाणी नसल्याने पाणी सुद्धा देणे शक्य होत नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत असून खरिपातील पिके याच्या नंतर पाऊस होऊनही तयाचा उपयोग होईल अस असे वाटत नाही व पुढे पाऊस झाला तर रब्बी हंगामाची शेतकऱ्यांना आशा आहेत आता पाऊस झाल्यास रब्बीची पिके घेता येईल या आशावादावर शेतकरी सध्या तग धरून पाऊसाची वाट पाहत आहेत.








