दापोडी पोलीस स्टेशनमध्ये महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात !
प्रतिनिधी : रोहन सोनाळे | |
पिंपरी चिंचवड | दापोडी : फुगेवाडी-दापोडी परिसरातील महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेच्या वतीने दापोडी पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी सचिन निकम (API), नवनाथ पवळे (PSI), मनोज जासूद (PSI) तसेच सागर शेडगे (HC) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास कोमल ताई जाधव, उपशहर प्रमुख पिंपरी विधानसभा; जयश्री वायकर, उपविभाग प्रमुख; कोमल वायकर, रेश्मा गायकवाड, भाग्यश्री बगाडे, उषा सपकाळ, कैलास जाधव,उपशहर प्रमुख, पिंपरी विधानसभा; फिरोज शेख प्रभाग प्रमुख; योगेश बहिरट, उपविभाग प्रमुख; दीपक सपकाळ शाखाप्रमुख,तसेच दीपक बगाडे, विनोद शिंदे,यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना शहर संघटक निलेश हाके व श्री. प्रमोद गायकवाड यांनी केले होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस आणि नागरिकांमधील आपुलकी, विश्वास व बंधुभावाचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.








