“धागा शौर्य का, राखी अभिमान की” सैनिक रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी : उज्वल जैस्वाल
दि. 31 ऑगस्ट प. भट राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट या ठिकाणी सैनिक बांधवांसाठी “धागा शौर्य का, राखी अभिमान की” हा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सविस्तर वृत्त असे की, सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक श्री वासुदेव जाधव, सुभेदार श्री शेषराव नरवाडे, कर्नल शिवराम निकम, श्री बाबुलाल हनवते, श्री दिनकर चिंचोले, श्री चंद्रकांत चिंचोले, श्री राजेश सिरसाट (बीएसएफ), सुभेदार श्री आनंदा उबरहंडे, सुभेदार श्री वैजिनाथ राऊत, नायक सुभेदार श्री दिनकर देशमाने, त्रिदल सैनिक संघटना राज्य उपाध्यक्ष जयसियाराम सोळंकी, श्री अशोक चिंचोले, श्री. दिगंबर म्हस्के, किसान अर्बनचे संचालक तथा मा. शिवशंकर तळेकर, मा. श्री श्रीकृष्ण सोळंकी, मा सैनिक श्री संजय इंगळे, मा सैनिक श्री अंबादास सिरसाट, त्रिदल सैनिक संघटना कोषाध्यक्ष श्री आदिनाथ भुसारी, श्री अनिल सवडे, नायब सुभेदार एकनाथ सातव आदी सैनिक बांधव उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्रिदल सैनिक संघटना राज्य उपाध्यक्ष जयसियाराम सोळंकी म्हणाले की, आज भाऊसाहेब शेळके यांनी लावलेलं रोपटं वटवृक्षात रुपांतरीत झालेलं आहे. शाळेतून विवीध गुणसंपन्न विद्यार्थी घडत आहेत. सैन्यातही काही विद्यार्थी गेले आहे. हे बघून आनंद झाला. सैनिक जिवनाबद्दल बोलताना,
*तुफान मे, होली मे, देश के सन्मान में,*
*अढीग कर्तव्य के विचल परिपाठी हुं,*
*मै खाकी हुं…. मैं खाकी हुं.*
अशा शायराना अंदाजात कर्तव्यदक्ष असलं पाहिजे. दरवर्षी बोलावून प्रेमाचा धागा बांधून आमच्यामध्ये शाळेबद्दल आत्मीयता वाढली आहे असे म्हणाले.
तर यावेळी अध्यक्षीय भाषणात संदीप दादा शेळके म्हणाले की, स्पोर्ट्स हब, शिक्षण हब, त्याचबरोबर जिल्हा क्रिडा पुरस्कार, स्वच्छ विद्यालय पुरस्कार असेल किंवा विज्ञान प्रदर्शन, स्कॉलरशिप असेल आमचा विद्यार्थी सातत्याने प्रगती करत आहे. शिक्षणाबरोबरच सर्व गुणसंपन्नता यावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन आपण करत असतो. आपण सैनिकांचा बहुमान करणे हे आमचे कर्तव्य आहे. आपला त्याग, बलिदान, शौर्य आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपण सिमेवर रक्षण करता. म्हणूनच आम्ही इकडे शांततेत जगू शकतो. आपला आदर्श घेऊन विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हाच बहुमान आमचा आहे. असे ते म्हणाले. माजी सैनिक शेषराव नरवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले तसेच वृक्ष संवर्धनासाठी लागेल तेवढे वृक्ष देण्याचा मानस माजी सैनिक एकनाथ सातव यांनी व्यक्त केला. यानंतर सर्व विद्यार्थिनींनी सैनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. तदनंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक राख्या व चित्रकला स्पर्धा याचे निरीक्षण मान्यवरांनी केले. व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले, सूत्रसंचालन किरण जाधव तर आभार प्रदर्शन रुपाली गवते यांनी केले.








