श्रावण मास निमित्त उज्जैन ते कुंभेफळ कावड यात्रेचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न!
कुंभेफळ चेतन सरदार :श्रावण महिन्याचे औचित्य साधून भगवान महादेव यांच्या पूजनासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेली उज्जैन ते कुंभेफळ कावड यात्रा रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि जल्लोषात पार पडली. [1] उज्जैन येथून निघालेली ही पावन कावड यात्रा कुंभेफळ येथे अवघ्या ९ दिवसांत यशस्वीरीत्या संपन्न झाली. या यात्रेदरम्यान शिवभक्तांचा व भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. कावड कुंभेफळ गावात दाखल होताच सर्वत्र भक्तीमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्यासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी झाली होती.
गावातील अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण पाहून मन भारावून गेले. कुंभेफळ येथील महाप्रसादाचे लाभ घेण्यासाठी दूरदूरवरून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. अशा रीतीने अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीपूर्ण वातावरणात या कावड यात्रेची यशस्वी सांगता झाली.
“श्रावण मास निमित्त श्रावण महिन्यांत भगवान महादेव यांच्या पूजनांत यावेळची उज्जैन ते कुंभेफळ दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कुंभेफळ येथे कावड यात्रा उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.कावड यात्रा उज्जैन ते कुंभेफळ येथे येण्या करिता ९ दिवसात संपन्न झाली.भाविकांची खूप गर्दी तसेच त्यांचा सुद्धा या कुंभेफळ या गावात चांगल्या आणि आनंदमय वातावरणात संपन्न संजानी. सर्वत्र स्वच्छ व आणि प्रसन्न अस वातावरण अभंरु पाहून मला प्रसन्न होऊन जाते.कुंभेफळ येथ महाप्रसादासाठी भाविक दूरदूरहून येतात तर आज ही कावड यात्रा पार पडली.”








