सावळविहीर विद्यालयास पटेल यांच्याकडून प्रिंटरची भेट; ३६ AI विद्यार्थ्यांचा सन्मान
प्रतिनिधी : राजेंद्र दुनबळे
शिर्डी (सावळविहीर बु.) : राहाता तालुक्यातील सावळविहीर बु. येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलला गुजरातमधील गणदेवी गावचे रहिवासी व साईभक्त श्री. कमलेश पटेल यांनी त्यांच्या मातोश्री गिताबेन राजूभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ BROTHER कंपनीचा उत्कृष्ट प्रिंटर भेट दिला. या उपक्रमातून विद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजास निश्चितच मदत होणार असून, विद्यालयाच्या वतीने श्री.कमलेश पटेल यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. श्री.कमलेश पटेल यांच्याशी विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ लेखनिक श्री.लोखंडे सर यांनी संपर्क साधला होता. त्यांचे सहकारी शिर्डी येथील श्री.बाबुराव गणपत कोते पाटील व श्री.वैभव बाबुराव कोते पाटील यांच्या हस्ते हा प्रिंटर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बनसोडे सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
कोते यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब कदम यांनी केला. यावेळी विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय श्री. बाळासाहेब जपे (काका), गावचे माजी सरपंच संतोष आगलावे स्कूल कमिटी सदस्य गणेश कापसे .राहुल पाटील आदी उपस्थित होते.
AI उपक्रमातील ३६ विद्यार्थ्यांचा गौरव
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेच्या ध्येयधोरणानुसार व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या तंत्रज्ञानावर आधारित AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) उपक्रमात प्रवेश घेतलेल्या व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. AI विभागातील प्रवेशित ३६ विद्यार्थ्यांना स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांच्या हस्ते प्रत्येकी १०१ रुपये याप्रमाणे एकूण ३ हजार ६३६ रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांना AI विभाग प्रमुख वाकचौरे सर तसेच सहाय्यक.काळेगोरे सर व धीवर सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास मुख्याध्यापक बनसोडे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ.डहाळे मॅडम .म्हस्के सर,खेडकर सर, श्रीमती.कानडे मॅडम धीवर सर वाकचौरे सर .इनामके सर, ज्येष्ठ लेखनिक लोखंडे सर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन खेडकर सर यांनी केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








