नानगाव येथील पाच वर्षाच्या मुलीचा विहिरीत ढकलून खुन. यवत पोलिसांनी लावला छडा. आरोपीला शोधून केले जेरबंद
प्रतिनिधी : अनिल गायकवाड.
दौंड तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे. येथील गुराळावर काम करणाऱ्या एका इसमाने तीन दिवसापूर्वी मुलीची आई हिच्यासोबत वाद झाल्याचा राग मनात धरून. पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करून. सदर पीडित मुलीस स्वतःबरोबर घेऊन जावून विहिरीमध्ये ढकलून खून केल्याचे आरोपीने कबूल केले असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक ०१/०९/२०२६ रोजी फिर्यादी यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन त्यांची मुलगी निर्भया वय ५ वर्ष,१० महिने,७ दिवस हीचे कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचेतरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले बाबत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने यवत पोलीस ठाणे गु.रजि क्र.९०२/२०२६ बी एन एस कलम १३७(२) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत असताना संशयित इसम नामे कालूसिंग उर्फ गोरख रायसिंग वसावे वय ३० वर्षे सध्या रा. रामचंद्र सर्जेराव खळतकर यांचे गुराळावर नानगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे मूळ रा.राणीपूर तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार. यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सर्व प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने त्याचा तीन दिवसापूर्वी मुलीची आई हिच्यासोबत वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून त्याने दि.३१/०८/२०२६ रोजी संध्याकाळी ०४: वाजताच्या सुमारास सदर पीडित मुलीस स्वतःबरोबर घेऊन जावून विहिरीमध्ये ढकलून देऊन खून केल्याचे कबूल केले.
त्यामुळे त्यास सदर गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आली आहे.
तसेच स्थानिक नागरिक अंमलदार अधिकारी यांच्या मदतीने सदरचे प्रेत विहिरीतून बाहेर काढून ते पोस्टमार्टम साठी ससून रुग्णालय या ठिकाणी पाठवून पोस्टमार्टम करण्यात आले आहे. आरोपीने पीडित मुलीला विहिरीत ढकलून देऊन तिचा खून केला या कारणाने गुन्ह्याच्या कलमांमध्ये बी एन एस कलम १०३(१) प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. सदर अटक आरोपीतास रिमांड कामी मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने सदर आरोपीस दि.०५/०९/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक. संदीपसिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग बापूसाहेब दडस, प्रभारी पोलीस निरीक्षक यवत पोलीस ठाणे संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यवत पोलीस ठाणे हे करीत आहे.








