दुःखाच्या क्षणी ‘दै.देशोन्नती’ ठरला आधारवड ; इंगळे कुटुंबीयांना मदत निधी सुपूर्द
१ लाख १५ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक बांधिलकी जपणारे स्वर्गीय बाबुराव इंगळे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर आलेल्या दुःखाच्या प्रसंगी दैनिक देशोन्नती परिवाराने सामाजिक संवेदनशीलता जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे दैनिक देशोन्नती परिवाराचे कुटुंब प्रमुख तथा आवृत्ती प्रमुख अनिल कसबे यांच्या संवेदनशील समयी मदतीचा हात पुढे करण्याच्या कल्पनेने देशोन्नती परिवारातील सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला दैनिक देशोन्नती परिवाराने केवळ बातम्यांपुरती नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांच्या सुख-दुःखातही सहभागी होण्याची परंपरा जपत इंगळे कुटुंबीयांना दिलेली ही मदत पत्रकार बांधवांमध्येही कौतुकाचा विषय ठरत आहे यावेळी दै देशोन्नती च्या वतीने इंगळे कुटुंबीयांना १ लाख १५ हजार ६०० रुपयांचा मदत निधी प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे दुःखाच्या काळात इंगळे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे यावेळी आवृत्ती प्रमुख अनिल कसबे शाखा व्यवस्थापक संदिप पतंगे यांनी बिलोली तालुका प्रतिनिधी साईनाथ शिरोळे यांच्यामार्फत मदतनिधी स्वर्गीय बाबूराव इंगळे यांच्या कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला यावेळी तालुका प्रतिनिधी साईनाथ शिरोळे पत्रकार संतोष चव्हाण, शेषेराव इंगळे कुटुंबीय व नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी स्वर्गीय बाबुराव इंगळे यांच्या स्मृतींना अभिवादन करून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.








