विमा कंपनीने वैद्यकीय खर्चासाठी सुपूर्द केलेल्या रकमेचा संगनमताने गैरवापर. विमाधारक व डॉक्टर पती-पत्नीवर गुन्हा दाखल.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
फिर्यादी- अभिजित शर्शिकात मोरे,वय-४२ वर्षे,व्यवसाय-शाखा व्यवस्थापक बजाज रा.३६/०९ विग्नेश बंगलो,दत्ता कृपा कॉलनी, काळेबोराटे नगर, हडपसर,पुणे. यांचे तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी- १) डॉ. विशाल गोविंद मिसाळ, २) माधुरी विशाल मिसाळ, ३) संकेत राजू होले गवळी वाडा दौंड ता दौंड जि पुणे याचे विरुद्ध गुन्हा. रजि नं ६६२/२०२६ भा.न्या.संहिता कलम ३१८(३).३१८(४)३१६(२).३३६(३).३१९(२).३४०(२).६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा घडला दिंनाक १३/०७/२०२४ ते १९०७/२०२६ रोजी मौजे जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,दौंड ता दौंड जि पुणे.
पुणे येथील बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड ४ था मजला,टॉवर ७,कॉमर्स झोन,सम्राट अशोक पथ जेल रोड,येरवडा पुणे.या कंपनीत शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत असून, कंपनीच्या वतीने कायदेशीर तक्रार व जबाब नोंदवण्यासाठी मला प्राधिकृत करण्यात आले असून सदर कंपनी भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणाकडे नोंदणी क्रमांक ११३ अन्वये नोंदणीकृत असुन ती सामान्य जनतेला विमा सेवा प्रदान करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की विमा कंपनीकडे संकेल राजू होले रा.पोस्ट ऑफिस जवळ,गवळीवाडा,ता.दौंड,जि.पुणे.या विमाधारकाने जीवनरेखा मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, दौंड येथे दिनाक १३-०७-२०२४ ते १९-०७-२०२४ या कालावधीत उपचार घेतल्या बाबत चा वैद्यकीय खर्चाचा विमा दावा क्र.२४०१४०५६० पी प्रतिपूर्तीसाठी दाखल केला होता. विमा कंपनी यांना या प्रकरणात संशय आल्याने सखोल तपास केला असता त्यामध्ये अफरातफार आढळून आली. त्यानुसार सदर क्लेम रद्द होणेस पात्र असल्याने रद्द करण्यात आलेले आहे.सदर विम्याच्या दाव्याची नियमित पडताळणी व तपासणी केली असता, कंपनीला अत्यंत धक्कादायक आणि बेकायदेशीर बाबी आढळून आल्या आहेत.
सदर दाव्यासोबत डॉ.माधुरी बहिरवाडे यांच्या मो.क्र व स्वाक्षरीचा हायटेक पॅथॉलॉजिस्ट अहवाल जोडण्यात आला होता, ज्यावर त्यांचा नावाचा डॉ.एम.एच.बहिरवाडे.एमबीबीएस एम डी.
सल्लागार रोगनिदान तज्ज्ञ नोंदणी क्रमांक”२००९/०६/२७९८
असा शिक्का असून त्यावर माधुरी नावाची इंग्रजी मध्ये सही आहे.
परंतु वैद्यकीय नोंदणी क्रमांक २००९/०६/२७९८ असा नमूद असून त्यावरील सही वेगळी आहे. त्या अनुषंगाने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सदर नोंदणी क्रमांकाची२००९/०६/२७९८ पडताळणी केली. तेव्हा असे निष्पन्न झाले की हा नोंदणी क्रमांक डॉ.माधुरी बहिरवाडे यांच्या नावे नाही. तसेच प्रमाणपत्र वरील क्यू.आर कोड स्कॅन केला असता त्यावर अमोल झिपारे नोंदणी क्र.२०१८०५१७७६ नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर नोंदणी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या शिवाय दावा अर्जासोबत सादर केलेले डॉ.माधुरी बहिरवाडे यांच्या नावाचे आधार कार्ड देखील तपासले असता त्यावर नाव माधुरी हरिश्चंद्र बहिरवाडे व जन्म तारीख ११/११/१९८४ दिसत आहे. त्या अनुषंगाने अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी केली असता नाव डॉ.माधुरी विशाल मिसाळ व जन्म तारीख ११/०९/१९८९ आढळून आले. त्यावरुन सदर व्यक्ती डॉक्टर नसताना बनावट मेडिकल कौन्सिल नोंदणी ऑनलाईन सिस्टीम मध्ये दाखवुन व दुस-या डॉक्टरांच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करुन बनावट आधार कार्ड व कागदपत्रे सादर करुन विश्वास संपादन करीत आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केली असल्याचे नमूद करण्यात आले असून. सदर कृत्य अत्यंत गंभीर असून फसवणूकीच्या दृष्टीकोनाने पूर्णपणे करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे. सदर विमा कराराच्या आणि वैद्यकीय व्यवसायाच्या कायदेशीर जबाबदारीचा भंग करून, कंपनीने उपचारापोटी विश्वासाने दिलेली रक्कम बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटून कंपनीचा आर्थिक अपहार केला आहे. डॉ.विशाल मिसाळ, माधुरी मिसाळ यांनी खोटे नाव व दुसऱ्या डॉक्टरांचा नोंदणी क्रमांकाचा गैरवापर करुन तसेंच रुग्ण संकेत होले यांचेशी संगनमत करून विमा कंपनीने वैद्यकीय खर्चासाठी सुपूर्द केलेल्या रकमेचा गैरवापर केला असल्याने जाणीवपूर्वक विश्वासघात केलेले आहे. या सर्व बाबींवरून हे स्पष्ट होते की जीवनरेखा मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक १) डॉ.विशाल गोविंद मिसाळ, २) माधुरी विशाल मिसाळ, ३) संकेत राजू होले (विमाधारक) यांनी संगनमत करून, असत्य व संशयास्पद वैद्यकीय अहवाल, ओळखपत्रे व शिक्का यांचा वापर करुन विमा कंपनीची आर्थिक फसवणूक व जाणीवपूर्वक विश्वासघात करण्याच्या उद्देशाणे गुन्हेगारी कट रचला. त्यांनी असत्य वैद्यकीय अहवाल व दस्तऐवज विमा कंपनीकडे सादर करुन कंपनीची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी वरील व्यक्तीविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. कसे नमूद करण्यात आले आहे दाखल अंमलदार पोलीस ना.पानसरे.तपासी अंमलदार पोलीस हवालदार अमीर शेख पुढील तपास करीत आहेत.








