पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी विक्रम गाढे, उपाध्यक्षपदी संभाजी लोंढे
रोहित जोशी | कोल्हार प्रतिनिधी |
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी विक्रम रघुनाथ गाढे तर उपाध्यक्षपदी संभाजी अण्णासाहेब लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हार खुर्द येथील कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात मार्गदर्शनाचे काम करण्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेच्या माध्यमातून तालुका पातळीवर संघटन मजबूत केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील दोन सक्रिय कार्यकर्त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवड पत्र वाटप प्रसंगी कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंतराव आठरे, प्रदेश उपाध्यक्ष पत्रकार सुरेश तरकसे, विखे कारखान्याचे माजी संचालक दीपक पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, राहुरी तालुकाध्यक्ष प्रकाश शिरसाठ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल पाटील, बबनराव शिरसाठ, नितीन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त कार्याध्यक्ष विक्रम गाढे व उपाध्यक्ष संभाजी लोंढे यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांना न्याय देण्याचे व परिषदेचे कार्य तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे








