रेशन दुकानातील धान्य आता तपासणार एफडीए
धान्याची गुणवत्ता, साठवणूक व्यवस्था आणि स्वच्छता तपासणार
रोहित जोशी | प्रतिनिधी |
रास्त भाव दुकानांमधून (रेशन) लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य मिळावे, धान्याची गुणवत्ता टिकून राहावी आणि वितरणातील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) रेशन दुकानांची तपासणी केली
जाणार आहे. यात धान्याची गुणवत्ता, साठवणूक व्यवस्था आणि स्वच्छता यासह विविध बाबी तपासल्या जाणार आहेत.
स्वस्त धान्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. दुकानदाराने धान्याची साठवणूक कशा पद्धतीने केली आहे. धान्य साठविलेल्या ठिकाणी स्वच्छता आहे का
अन्न व औषध प्रशासनाकडून स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत धान्याचे नमुने असुरक्षित आल्यास परवाने रद्द करण्यात येणार असून, स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याची व्यवस्थित साठवणूक करावी.
गौरव जगताप अन्न सुरक्षा अधिकारी.
याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. स्वस्त धान्यात उंदराच्या लेंड्या, दगड, खडे, आळ्या, जाळे आढळून आल्याची उदाहरणे आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी होणार आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांकडून
धान्याची साठवणूक कोंदट आणि अस्वच्छ वातावरणात केली जाते. त्यामुळे धान्य खाण्यायोग्य राहत नाही. असे धान्य खाण्यात गेल्यास आरोग्यास धोका पोहोचू शकतो. स्वस्त धान्य दुकानांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. रेशनचे धान्य दुकानात आल्यानंतर दुकानदार ते व्यवस्थित ठेवत नाहीत. त्यामुळे त्यात खडे, किडे होतात. असे धान्य खाण्यात गेल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे.
रेशन दुकानांनाही अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. नियम पूर्वीपासूनच आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, स्वस्त धान्य दुकानदारांकडून तपासणी होणार आहे.








