कोल्हारला तीन वाहनांचा विचित्र अपघात
काळा मळ्याजवळ घटना; वाहनांचे मोठे नुकसान
प्रतिनिधि | रोहित जोशी | कोल्हार :
दि. १४ सप्टेंबर २६ : कोल्हार -घोटी रस्त्यावरील काळे मळा (खर्डे वस्ती) परिसरात दुपारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघाताची तीव्रता भिषण होती. केवळ नशिब बलवत्तर म्हणून तिनही वाहनांमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.
मढी येथून दर्शन घेऊन संगमनेरकडे निघालेली वॅगनार कार आणि संगमनेरहून दूध घेऊन राहुरीकडे जाणारा दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली. याच दरम्यान टँकरच्या पाठीमागून एक्सयूव्ही कार येत होती. टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एक्सयूव्ही कार ट्रकला पाठीमागून धडकली. व्हॅगनर
कारमध्ये बालकांह सात प्रवाशी होते. अपघाताचे स्वरूप गंभीर असतानाही सर्व प्रवासी सुरक्षित बचावले. काहींना किरकोळ मार लागला असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिस ठाण्याचे शिवाजी नन्हे आणि पोपट भोईटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने
अपघातग्रस्त वॅगनार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यामुळे काही काळ विस्कळित झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. या अपघातामुळे कोल्हार-घोटी मार्गावरील भरधाव वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.








