मुजरे मोहमदपूर येथे पारंपारिक बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
शेतकऱ्याचा सच्चा साथीदार बैलाची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, राहुल तायडे यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांक
चंदन जंजाळ | प्रतिनिधी
बाळापूर ताप्र: शेतकऱ्यांचा आवडता आणि पारंपारिक सण असलेला बैलपोळा यंदा गट ग्रामपंचायत रामगाव अंतर्गत मौजे मुजरे मोहम्मदपूर येथे मोठ्या उसाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाची सावट निर्माण झालेली आहे अशा कठीण परिस्थितीत तीही बळीराजाने आपल्या खऱ्या साथीदारावरील प्रेम कायम ठेवत हा सण उत्साहाने साजरा करण्यात आला . आपल्या शेतीसाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. सकाळपासून शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगमोटी करून शिंगाना बेगड लावून गळ्यात घुंगराचा माळा आणि अंगावर झूल घालून आकर्षण सजविले होते सायंकाळच्या सुमारास गावातील सर्व बैल जोड्या पारंपारिक पद्धती वाद्याच्या गजरात मारुती संस्थान आणि बुद्ध विहारामध्ये प्रांगणात एकत्र आणण्यात आल्या
तेथील गावातील मान्यवराच्या हस्ते बैलाची विधी विथ पूजा करण्यात आली त्यानंतर बैलांना पुरणपोळी गुळ खोबरे याचा नैवेद्य भरून त्यांचे औक्षण करण्यात आले लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी या उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी घेण्यात आलेल्या उत्कृष्ट बैल जोडी सजावट मध्ये *प्रथम क्रमांकाची मानकरी शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल भगवान तायडे
हे ठरले त्यांच्या आकर्षण सजवलेल्या बैल जोडीने सर्वांचे लक्ष वैधून घेतले.
द्वितीय क्रमांक गावातील शेतकरी देवानंद मेश्राम यांच्या बैल जोडीला मिळाला तर तृतीय क्रमांक बजरंग बडे यांच्या जोडीला देण्यात आला याशिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन गौरवण्यात आले यामध्ये सज्जन गोपनारायण पारस गोपनारायण प्रदीप बडे नाक्षण डोंगरे अजबराव इंगळे संजय बडे रामदास बडे इतर गावकऱ्यांचा समावेश होता
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील युवकाने परिषद घेतले या उत्सवामुळे गावात एकोपा आणि पारंपारिक संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला .








