उपबाजार वाडेगाव येथे मुंग खरेदी शुभारंभ
बाळापूर तालुका प्रतिनिधी | चंदन जंजाळ
कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वाडेगाव येथे दि.06/09/2026 रोजी मुंग खरेदीचा शुभारंभ करण्यात आला बाळापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविंद्र सरप, लक्ष्मण सरप यांच्या हस्ते मुंग उत्पादक शेतकरी प्रदिप दिनकर ताले माझोड , शिवाजी मधुकर गोळे निमखेड , गोपाल कैलास इंगळे तांदळी यांचा सत्कार करण्यात केला. यावेळी संचालक रामभाऊ काळे , रमेश ठाकरे , सचिव के.एस.नावकार उपस्थित होते.सर्वाधिक मुंग उत्पादक शेतकऱ्याला 13,751 रु.भाव मिळाला. कार्यक्रमाचे संचालन निलेश रोकडे यांनी केले.या कार्यक्रमाला अडते देवेंद्र फाळके , विजय पाटेखेडे, संतोष सरप , नरेंद्र कातखेडे व्यापारी बिहारीलाल जयराज , गोविंदराव मसने ,वहिद भाई , अमोल बेलसरे , जैनुल्ला खाॅं , सहदेव चिंचोलकर यांच्यासह बाजार समितेचे कर्मचारी अरुण नळकांडे, अंकुश नळकांडे, दिलीप दळवे, साहेबराव निखाडे उपस्थित होते.








