राज्याचे अप्पर मुख्य सचिवाची घेतली मंत्रालय भूमी अभिलेख संघटनेने भेट
भूमी अभिलेख विभागातील मांडल्या समस्या
मंत्रालय भूमी अभिलेख अधिकारी-कर्मचारी संघटनेचे वतीने निवेदन सादर
चंदन जंजाळ | बाळापूर तालुका प्रतिनिधी
अनु जाती जमाती / वि जा / भ. ज./ इ. मा. व./ वि. मा. प्र. शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय शाखा भूमी अभिलेख संघटनेने 10 सप्टेंबर रोजी मंत्रालयात राज्याचे महसूल व वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट घेऊन भूमी अभिलेख मधील अधिकारी -कर्मचारी यांच्या समस्या मांडल्या.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मंत्रालयातील अधिकारी भारत वानखेडे यांचे नेतृवात केंद्रीय कार्यकारणीचे राज्य महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे, कार्यकारणीचे राज्य कार्यध्यक्ष सुभाष गवई,मंत्रालय भूमी अभिलेख संघटनेचे राज्यध्यक्ष किशोर इंगळे,
केंद्रीय संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल हिवाळे, सुरेश मोरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते,
भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांना तांत्रिक वेतन श्रेणी, उपअधीक्षक भूमी अभिलेख सवर्ग गट ब पदोन्नतीसाठी 65% प्रमाण , भुमापक पदाची मोठ्या प्रमाणात भरती करणेत येऊन कनिष्ठ पदाकडील मोजणी करणे परिरक्षण भुमापक, शिरस्तेदार यांना देण्यात येऊ नये, कर्मचारी यांना संख्येप्रमाणे मोजणी साहित्य व सुविधा,वेतनात प्रवास भत्ता, संप काळातील वेतन, या व इतर मागण्याबाबत अप्पर महसूल सचिव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.आणि बैठकीला वेळ मिळण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव महसूल व वन विभाग श्री खारगे यांनी आपल्या संघटनेला लवकरच वेळ देणेत येऊन भूमी अभिलेख मधील प्रश्न लवकर सोडविण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले दिले








