पावसा अभावी शेतातील सोयाबीनचे पीक वाळले !
सागर इंगळे | रायपूर प्रतिनिधी
दिनांक १६ / ०९ / २०२६ / रायपूर सर्कल मध्ये गेल्या एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे उन्हाच्या चटक्यामध्ये शेतातील सोयाबीनचे पिके होरपळून वाळायला लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे या सर्कलमध्ये पहिले शेतकरी वर्ग दुबार पेरणीमुळे आर्थिक टंचाईत सापडला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात येणारे सोयाबीनचे पीक हातातून पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे रायपुर पिंपळगाव सराई सैलानी घाटनांद्रा पांगरी दुधा माळवंडी ढासाळवाडी मातला पळसखेड या परिसरातील शेतामध्ये गेल्या 40 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिके वाढायला सुरुवात झाली आहे ज्यांच्याकडे पाणी आहे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत नाही वीज वितरण कंपनीने दिवसाची लाईन रात्री सोडणे चालू केले आहे रात्री शेतकरी शेतामध्ये सोयाबीनच्या पिकांना पाणी कसे देणार रात्रीच्या वेळी शेतामध्ये हिंस्र प्राणी साप यांचा धोका असतो त्यामुळे शेतकरी वर्ग सर्वच बाजूने अडचणीत आला आहे.








