माहाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या !
परभणीत ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमची मागणी
राष्ट्रपतींना निवेदन सादर
कुलदीप गायकवाड | परभणी
बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार बी टी ऍक्ट १९४९ रद्द करून ट्रस्टी म्हणून सर्व बौद्ध समुदायातील व्यक्तींची निवड करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत राष्ट्रपतींना निवेदना द्वारे केली आहे.
महाबोधी महाविहार हे बौद्धांचे पवित्र स्थळ असून येथे असलेला ब्राह्मणांचा ताबा हटववून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन धम्मपाल अनागारिक यांनी सुरू केले होते. त्यांच्या १६२ व्या जयंती दिनी त्यांच्या समर्पित कार्याला वंदन करून आज १७ सप्टेंबर रोजी अभिवादन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शीख, मुस्लिम हिंदू इत्यादी धर्माच्या प्रार्थना स्थळ मंदिरे यांच्यावर त्या त्या धर्माचे ट्रस्टी आहेत. परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार येथे ब्राह्मणांचा ताबा आहे. बिहार टेम्पल ऍक्ट १९४९ हा रद्द करून ट्रस्टी म्हणून बौद्ध धम्माचे व्यक्ती यांचा समावेश करावा व पूर्णपणे बुद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर इंजी एम एम भरणे, गोपीनाथ कांबळे, आनंदा गरजे संजय बगाटे बी पी धबाले दशरथ गायकवाड धोंडीराज खेडकर सुनील पवार अशोक कांबळे राजकुमार एंगडे व्ही व्ही वाघमारे एम एम बरे गौतम पंडित शिवाजी सुगंधे नागसेन हत्तीअंबिरे उत्तम रणवीर भगवान वाघमारे सुभाष मकरंद सुरेश मस्के रामराव जोंधळे बालासाहेब कीर्तने व्ही एन राक्षसे रा का भारशंकर श्याम मोरे महेंद्र सानके अनिल मस्के संजय मुळे मिलिंद पुंडगे सुरेश प्रधान नितीन टोंगराज भीमराव वाघमारे सुबोध कांबळे रवी वावळे विजय सावंत यांच्या सह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, धम्म मैत्री संवाद अभियानचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.








