अकोल्यात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई दोन तूप उत्पादक कंपन्यांचे परवाने रद्द.
अकोल्यात दोन तुप उत्पादक कंपन्याचे परवाने रद्द !
चार लाख १५ हजार ९३ रुपायाचा माल जप्त !
अन्न व औषध विभागाची धडक कारवाई
चंदन जंजाळ | प्रतिनिधी
अकोला जि प्र नागरीक मोठ्या उत्साहाने पॅकिंग केलेले वस्तू घेतात परंतू उत्पादक आणि विक्रेते त्या वस्तूची मुदत किंवा उत्पादक तारखेवर लक्ष न देता फक्त आपल्या मालाची विक्री मात्र जोरात करतात अकोला येथील एकाच वेळीस दोन वेगवेगळ्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन छापा मार करून एकून चार लाख १५ हजार ९३ रुपयाचे तुप जप्त केले मिळलेल्या माहिती नुसार अन्न व औषध विभाग यांच्या मार्फत दिनांक १६.०९.२०२६ व १७.०९.२०२६ रोजी अकोला शहरातील खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. सदर तपासणी दरम्यान कालबाह्य तूप विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे आढळून आल्याने दोन आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १६.०९.२०२६ रोजी मे पुर्वा मार्कटींग आदर्श कॉलनी अकोला येथे तपासणी केली असता १५ विविध प्रकारच्या कालबाह्य तुपाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले. सदर साठा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण वजन ४५८ किलो व अंदाजे किंमत ₹ ३,३४,०९३/- आहे.
तसेच दिनांक १७.०९.२०२६ रोजी मे . लिलाधर जगजीवन अकोला .येथे तपासणी केली असता वटूला प्रिमियम तुप (Vatula Premium Ghee ) या खाद्यपदार्थाचा कालबाह्य साठा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले. सदर साठा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण वजन १३५ किलो व अंदाजे किंमत ₹ ८१,०००/- आहे.
अशा प्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५९३ किलो कालबाह्य तूप, अंदाजे ₹ ४,१५,०९३/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच वरील दोन्ही आस्थापनांचे तात्काळ प्रभावाने परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
सदर कारवाई तुकाराम मुंडे मुख्य अन्न व औषध प्रशासन विभाग मुंबई तसेच एस. डी. केदारे, सह आयुक्त (अन्न) (अमरावती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. डी. जी. वीर, सहायक आयुक्त (अन्न), अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आर. डी. सोळंके व श्री. किं. ह. बोरचाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला यांनी केली.
जप्त करण्यात आलेल्या कालबाह्य खाद्यपदार्थांबाबत नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.








