अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार नेत्र विभागामधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद…
पी.एन.देशमुख | जि. प्रतिनिधी. अमरावती.
डोळ्याच्या ऑपरेशन होणाऱ्या रुग्ण वाऱ्यावर सोडलेत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी राजीनामा द्यावा जिल्हाधिकारी झोपा काढत आहे का ?
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकत चाललेले आहे कारण डोळ्याच्या शस्त्रक्रिया वार्ड बंद करून त्यामध्ये वार्ड क्रमांक 16 मधील संपूर्ण रुग्ण भरलेले आहेत आणि डोळ्यांच्या ऑपरेशन साठी येणारे मोती बिंदूच्या ऑपरेशन साठी येणारे सर्व रुग्ण वाऱ्यावर सोडले आहेत . असे निर्णय कोण घेत आहेत असा प्रश्न आता सर्व सामान्य रुग्ण विचारत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक ज्यांच्याकडे हा पदभार आहे त्यांना हा प्रकार माहिती नाही का.? असे सवाल देखील आता रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया साठी असलेला वॉर्ड कसा काय बंद करावा आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन असलेले रुग्ण कसे काय शिफ्ट करावे आणि आता तिथे असलेल्या करोड रुपयांच्या मशीन या पूर्णपणे इफेक्टेड झाले नाही का आणि ज्या रुग्णांच्या डोळ्याचे ऑपरेशन व्हायचे आहेत ज्यांना ऑपरेशन करायचे आहेत त्यांची व्यवस्था कुठे करण्यात आली या रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेले आहेत . जर लवकरच मोत्याबिंदू ऑपरेशन आय वॉर्ड व तिथली ऑपरेशन ओटी तात्काळ सुरू केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयामध्ये बसून झोपा आंदोलन बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे समोर घडणाऱ्या सर्व परिस्थितीला अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक हे जबाबदार राहतील तात्काळ अमरावती जिल्ह्यामधील डोळ्यांच्या रुग्णांची ऑपरेशनची व्यवस्था करा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा असा इशारा रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.








