गोदावरी मनार स्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस उत्साहात साजरा.
बिलोली तालुका प्रतिनिधी / गंगाधर कांबळे
शंकरनगर – येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल व ज्यू.कॉलेज शंकरनगरच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस प्रभात फेरी काढून उत्साहात साजरा करण्यात आला.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा एन. डी. सी.बँकेच्या उपाध्यक्षा डॉक्टर मीनल निरंजन पाटील खतगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठवाड्यातील शूरवीरांनी हैद्राबाद संस्थान विरोधात कसा लढा लढवला व तो लढा यशस्वी कसा कसा केला ,निजामाच्या तावडीतून मराठवाडा कसा मुक्त केला, सखोल असे मार्गदर्शन केले व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्राचार्य डी.पी. पांडेय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मराठवाडा दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, चित्रकला, एकांकिका,विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमास बाळासाहेब पाटील खतगावकर,सदाशिव पाटील डाकोरे,संतोष पाटील पुयड, गजू पाटील, आनंदराव माने ,पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी आर.के.,तोडे उर्मिला तर आभार संस्कृती पूसनाके यांनी केले.








