तेरा वर्षाची प्रतीक्षा संपली बालाजी मुंगडे यांच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा मार्ग झाला मोकळा
बिलोली तालुका प्रतिनिधी | गंगाधर कांबळे.
2013 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचि अहर्ता परीक्षा उत्तीर्ण होऊन तब्बल तेरा वर्ष पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या
बालाजी मुंगडे यांचा न्यायालयीन प्रक्रियेमुळे आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या या प्रदीर्घसंघर्षाला आता यशाची किनार लाभलेली आहे.
सन 2013 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अहर्ता परीक्षा उत्तीर्ण होऊनही विविध प्रशासकीय प्रक्रिया आणि न्यायालयीन बाबीमुळे बालाजी मुंगडे यांना पदोन्नतीसाठी तब्बल तेरा वर्षाचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली अखेर न्यायालय निर्णयानंतर आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 2025 -26 निवड सूची अंतर्गत पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शासनाच्या सूचनेनुसार संबंधित उमेदवारा कडून आवश्यक माहिती व कागदपत्रे मागवण्यात आली असून मुंगडे हे आवश्यक कागदपत्र संबंधित प्रक्रिया पूर्ण करून माहिती सादर केलेली आहे उपलब्ध रिक्त पदाची विभाग निहाय माहिती आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून तेरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता नियुक्तीचे नियुक्ती आदेश कधी मिळतो याकडे बालाजी मुंगडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
बालाजी मुंगडे हे मूळचे तडखेल तालुका देगलूर येथील रहिवासी असून ते सध्या रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असुन त्यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सेवाभाव कायम जपला 2013 मध्ये पदोन्नतीच्या अहर्ता परीक्षेत मिळवलेले यश तब्बल तेरा वर्ष पदोन्नतीच्या प्रतीक्षेत राहिले मुंगडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत सेवेत सातत्य ठेवले. तेरा वर्षाची प्रदीर्घ प्रतिक्षा न्यायालयीन प्रक्रिया नंतर मोकळा झालेला पदोन्नतीचा मार्ग आणि आता नियुक्ती आदेशाचे प्रतीक्षा हा त्यांच्या सेवा प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या यापदोन्नतीच्या संधीमुळे मुंगडे यांच्या सहकार्यामध्येही आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून लवकरच त्यांना फौजदार पदाचा नियुक्ती आदेश मिळावा अशा अनेकाकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.








