डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची धुरा भैय्यासाहेब आंबेडकर यांनी समर्थपणे सांभाळली : बाबासाहेब धबाले
कुलदीप गायकवाड | मराठवाडा विभागीय प्रतिनिधी
भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृति दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा परभणीच्या वतीने विशेष विनम्र अभिवादन सभेचे आयोजन सारनाथ बुद्ध विहार, सारनाथ कॉलनी, धार रोड, परभणी येथे करण्यात आले होते.या प्रसंगी
भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व बौद्ध धम्माच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीचे जिल्हा अध्यक्ष इंजि डॉ एम एम भरणे तर प्रमुख वक्ते म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव बाबासाहेब धबाले हे होते.आद धबाले यांनी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भैय्यासाहेब आंबेडकर यांनीच खऱ्या अर्थाने ही चळवळ पुढे नेली. भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्याभूमीची निर्मिती, विधानपरिषदेचे आमदार तसेच बौद्ध संस्कार पाठ या पुस्तकाची निर्मिती अशा महत्वपूर्ण विषयावर काम केल्याचे सांगितले .या कार्यक्रमास समाजातील नागरिक, बौद्ध उपासक-उपासिका, कार्यकर्ते, पदाधिकारी, बौद्धाचार्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती ,
भारतीय बौद्ध महासभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याच्या विचारांना पुढे नेणारी संस्था असून, सामाजिक प्रबोधन, बौद्ध धम्माचा प्रसार आणि समाज जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविते.असे त्यांनी सांगितले.या प्रसंगी इंजि डॉ एम एम यांनी ही भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करुन या धम्म संस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले व संस्थेच्या वतीने अनेक धम्मदिक्षेचे कार्यक्रम घेऊन धम्म चळवळ गतिमान करण्याचे महत्वपूर्ण कार्य कल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी आद. भारत देवरे, शहराध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती . कार्यक्रमासाठी विविध पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमासाठी डी. आर. मगरे शहर सरचिटणीस, उत्तम रणवीर, नामदेव ढेपे, एम. एम. बरे, भारत खाडे,यांच्यासह महिला मंडळाच्या बहुसंख्य उपासिका अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजात प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम रणवीर यांनी तर आभार प्रदर्शन नामदेव ढेपे यांनी केले.शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.








