सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन…
कुलदीप गायकवाड | मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी च्या वतीने दि.१७ सप्टेंबर रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोर सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंजि. डॉ. एम. एम. भरणे हे होते. तर प्रमुख उपस्थितीत राज्य सचिव बाबासाहेब धबाले हे होते.
यावेळी सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्रिसरण पंचशी ल घेण्यात आले व भैय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास के. वाय. दवंडे,दशरथ गायकवाड, डी. आय. खेडकर, व्ही. व्ही. वाघमारे, आनंदा भेरजे, महेंद्र सानके, अविनाश सरवदे, सुनील पवार, राजकुमार येंगडे, शंकर भारशंकर, भारत खाडे, अशोक कांबळे, नागसेन हत्तीआंबीरे, एन. के. पैठणे, नामदेव ढेपे, पी. एल. वानखेडे, शहराध्यक्ष भारत देवरे, उत्तम रणवीर, ज्ञानोबा खरात, एम. एम. बरे, सुभाष मकरंद, गोपीनाथ कांबळे, मनपा कर्मचारी मस्के साहेब, गोपाळराव नाटकर, आदी उपस्थित होते..








