खडसंगी ग्रामपंचायत चे दस्तऐवज चोरी गेल्यावर क्रीडांगनाची चौकशी लावणार काय ?
खडसंगी ग्रामस्थांचा सवाल ?ग्रामपंचायत मधून शासकीय दप्तर चोरीचा प्रयत्न !
समीर बल्की | तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज शनिवार सुट्टीचा दिवस असून, ग्रामपंचायत मधून मागील खिडकीतून महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेचे रजिस्टर, नमुना, असे तीन थैलीत ग्रामपंचायत मधील कागदपत्र ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सांगण्यावरून मागील खिडकीतून चोरून नेत असताना ग्रामपंचायत चपराशी कृष्णा सातपैसे यांनी कर्मचाऱ्यांनी काढून नेण्याचा प्रयत्न करीत असताना गावकऱ्यांनी भरदिवसा दुपारी जवळपास १ वाजताच्या सुमारास पकडण्यात आले. त्यामुळ खडसंगी ग्रामपंचायतचे कागदपत्र चोरी गेल्यावर क्रीडांगनाची चौकशी लावणार काय असा प्रश्न पत्रकार परिषदेतून गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सविस्तर माहिती याप्रमाणे की, ग्रामपंचायत खडसंगीच्या आवारात मागील पंधरा दिवसांपासून गावातील युवकांचे ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत दिनांक २२ सप्टेंबर २०२६ ला विशेष ग्रामसभेचे आयोजन माँ मनिका देवी सभागृह येथे नोटीस काढल्यानुसार ठरविण्यात आलेली होती. मात्र ग्रामसभा दोन दिवसावर येऊन ठेपताच आज दिनांक १९ सप्टेंबर २०२६ ला दुपारी १ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत मध्ये असलेले सन २०२5 – २6 व 2026-27 या वर्षातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कागदपत्र पासबुक, चेकबुक, एमबी, बिल, रजिस्टर यासह आदी तीन थैली कागदपत्र सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायत मधील मागील खिडकीतून चोरून नेत असताना ग्रामपंचायत मागील सिद्धार्थ मेश्राम यांच्या घरी असलेल्या महिलाना दिसून आले. सदर कागदपत्राची तीन थैली ही ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर यांच्या घरातील दरवाज्यातून गावकऱ्यांनी हस्तगत केल्या आहे. याबाबत ग्रामपंचायत चपराशी यांना विचारले असता ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत मधील मागील खिडकीतून महत्वाचे कागदपत्र बांधून असलेले गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत ते मागील खिडकीतून काढून घेऊन ये असे मला सांगितले. असे उपस्थित प्रतिनिधी जवळ सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सचिव कवडू तराळे यांना विचारले असता २२ सप्टेंबर ची ग्रामसभा आल्यामुळं सदर कागदपत्र बंदर ग्रामपंचायत येथे झेरॉक्स काढण्याच्या दृष्टीकोनातून बोलावण्यात आले होते. असे सांगितले. परंतु गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेत सुट्टीच्याच दिवशी आणि ते ही मागील खिडकीतून कागदपत्र का काढून नेण्यात आले. यावर धरणे आंदोलन करणाऱ्यांना चोरीचा आरोप करून फसविण्याचा तर डाव नाही ना असाही प्रश्न धरणे आंदोलन करत्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी ग्रामपंचायत मधून मागील खिडकीतून कागदपत्र काढून नेत असलेल्या चपराशी व सबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, पोलीस स्टेशन चिमूर यांना तक्रार देऊन मागणी केली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून खडसंगी ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन सुरू आहे. एकीकडे २२ सप्टेंबरला ग्रामसभा लागलेली असताना ग्रामपंचायत मधून मागील खिडकीतून चोरीसारखे कागदपत्र काढून नेले जाते. मग खडसंगी येथील क्रीडांगनाची चौकशी कधी दस्तऐवज चोरी गेल्यावर प्रशासन चौकशी लावणार काय ? राजू गेडाम, ग्रामस्थ आंदोलक
थैलीत हे होते कागदपत्र
कॅशबुक पाणी पुरवठा, कॅशबुक सामान्य फंड, कॅशबुक १५ वा वित्त, नमुना १५ साठा रजिस्टर सामान्य, नमुना १५ साठा रजिस्टर पाणी पुरवठा, नमुना १५ पंधरावा वित्त आयोग, नमुना १९ पाणी सामान्य पुरवठा, कार्यवाही अहवाल रजिस्टर २०२५-२६, व्हावचर फाईल, २०२६ – २७ चे कॅशबुक एमआरजीएस, जनसुविधा, पंधरावा वित्त व्हावचर फाईल सामान्य, पाणी पुरवठा, पासबुक, चेकबुक, नमुना १९ सामान्य पाणी पुरवठा, असे महत्वाचे एमआरजीएस गठ्ठा बांधून ठेवलेला आहे. असे ग्रामपंचायत सचिव यांनी चपराशी सातपैसे यांच्या व्हॉट्सॲपवर कागपत्राची यादी पाठविली होती.








