अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सरकारी नोकरीच्या बनावट ऑर्डर देऊन तरुणांना फसविणारी टोळी…
पी एन देशमुख.| जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती. टपाल विभागात सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून अमरावती जिल्ह्यातील धारणी बेळघाट येथील तिघांची एका भामट्याने तब्बल २१ लाख १० हजार रुपयाची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी नांदगाव खासदेकर यांच्या तक्रारीवरून धारणी मेळघाट पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी रात्री बाबू बन्सी धुर्वे (वय ५१रा. धारणी) या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीने खासदेकर यांच्यासह अन्य दोन तरुणाची देखील आर्थिक फसवणूक केली . संसद बाबू धुरवे हा एम एस ई बी कार्यालय अमरावती जिल्ह्यातील धारणी मेळघाट येथे ऑपरेटर म्हणून नोकरीस होता. रोड नातेवाईक असल्याने नानक राम व त्याच्यात ओळख होती याच विश्वासाचा कायदा घेऊन आरोपीने मे २०२३ मध्ये फिर्यादीच्या मुलीला पोस्टमन पदार नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले यासाठी फिर्यादीची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयाची आर्थिक फसवणूक केली. तिला बोगस नियुक्तीपत्र ही दिले. तिला पोस्ट खात्यात रुजू होण्यासाठी अमरावतीला देखील पाठवण्यात आले. मात्र तिथे गेल्यावर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. आरोपीने सुरेश खासदेकर यांच्या मुलाला ही पोस्टात नोकरी लावण्याचे सांगून ७ लाख ६० हजार रुपये उकळले. तर मोगदा येथील नामदेव सुडस्कर यांच्या मुलाला नोकरीची खोटी ऑर्डर्स देऊन ८ लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार नमूद आहे. आरोपीने तिघाकडून एकूण २१ लाख १० हजार रोकड उकळली. त्या बदल्यात त्यांना बनावट नियुक्ती पत्र देखील लिहिली आरोपी हा एकटा नसून यात मोठे राकेट असण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिढी चालणे काही पैसे परत मिळविले, परंतु उर्वरित रकमेसाठी आरोपी टाळाटाळ करू लागला. अखेर याप्रकरणी धारणी मेळघाट पोलीस ठाण्यात फिर्यादी नानाकराम कासदेकर यांच्या तक्रारीवरून तसेच आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीणच्या परवानगीने आरोपी बाबू बन्सी धुर्वे यांच्या विरुद्ध फासणीकाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेब बाहेर गेले आहेत हे आले की डायरेक्ट ड्युटीवर जावे लागेल, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले मात्र त्यानंतर फोन रिसीवर करणे आरोपीने बंद केली.








