भुसावळ तालुका बौद्ध महासंघ स्थापन.
चक्रधर महाले | भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ तालुका बौद्ध महासंघ ट्रस्ट च्या अध्यक्षपदी श्री.महेश सपकाळे उपाध्यक्षपदी श्री.गजानन निंबाळकर तर सचिव पदी श्री.विजय सावळे यांची निवड,, आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी भुसावळ तालुका बौद्ध महासंघाचे वतीने भुसावळ तालुका बौद्ध महासंघ ट्रस्ट स्थापन करण्यासाठी मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.ठीक बारा वाजता भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहावर मिटींगला सुरुवात झाली.सदर मीटिंगमध्ये खालील प्रमाणे भुसावळ तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते, डॉक्टर श्री अर्पित तायडे, श्री जे.पी सपकाळे सर, नितीन भालेराव सर, श्री.सुधाकर महिपत श्री.सोनवणे साहेब श्री.विजय बाबुराव साळवे श्री.गणेश भिवसन जाधव श्री.अनुप भाऊ खोब्रागडे श्री.दीपक नन्नवरे, श्री अनिल चोखा जी आव्हाड श्री.महेंद्र मेढे सर श्री रविकांत बावस्कर श्री.प्रशांत तायडे ग्रामपंचायत अधिकारी, श्री.बाळाभाऊ मोरे श्री.स्वप्नील इंगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.सदर मीटिंगमध्ये बहुमताने वरील प्रमाणे कार्यकारणी तयार करण्यात आली.अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. व पुढे ट्रस्ट स्थापन करून समाजासाठी आवश्यक असलेले समाज उपयोगी कार्य करण्यासाठी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या.निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला.








