कवी प्रमोद पंत अकोला आकाशवाणीवर
मिलिंद इंगळे | अकोला प्रतिनिधी
स्थानिक मूर्तिजापूर येथील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले प्रसिद्ध कवी ,साहित्यिक प्रमोद पंत यांना अकोला आकाशवाणी अकोला यांच्या नियमीत प्रसारीत होणाऱ्या “अक्षरयात्रा “कार्यक्रमात आमंत्रीत करण्यात आले असुन सोमवार दि.21/09/2026 रोजी त्यांच्या साहित्याचा प्रवास उलगडला जाणार आहे .या मध्ये त्यांची एक कथा व काही निवडक प्रसिद्ध कवीतांचे प्रसारण सकाळी ,10 वाजता रसीक श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे .कार्यक्रमाचे निवेदन श्री समीर शिरवळकर यांनी केले असुन
सादरकर्ते श्री विनोद गवळी राहणार आहेत .
साहित्यीक कवी प्रमोद पंत यांची आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या “आत्मशोध “या पहिल्या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त आहे .त्यांचे साहित्य महाराष्ट्रातल्या तमाम प्रथित यशवृत्तपत्रातून . व दीपावली विशेषांकातून प्रसिद्ध असून यापूर्वी त्यांना समाजभूषण पुरस्कारासह साहित्य वर्तुळातील प्रतिष्ठेचे 15 पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केले आहे. त्यांचे ” पंतांचे अभंग” हे आधुनिक अंभग लेखनाचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहेत .
तेव्हा रसीक श्रोत्यांनी आकोला आकाशवाणीच्या FM102.4MHZ या वाहीणीवर त्यांच्या साहित्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कवी प्रमोद पंत , व प्रसारण अधिकारी अकोला आकाशवाणी अकोला .यांचे वतीने रसीक श्रोत्यांना करण्यात आले आहे .
त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन करण्यात आले आहे .








