मुखेड-कंधार तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा; माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी.
मनोज बिरादार | मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड आणि कंधार तालुक्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, हे दोन्ही तालुके तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ म्हणून जाहीर करावेत,अशी ठाम मागणी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.आज नांदेड दौऱ्यावर आले असताना कृषीमंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
निवेदन देताना शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शिष्टमंडळाने कृषीमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.मुखेड व कंधार तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कृषीमंत्र्यांनी स्वतः या भागाची पाहणी करावी,अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.या प्रसंगी सरपंच संदीप घाटे आणि भारत पाटील भोसले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.








