नियमित व्यायाम करुन सकस आहार घेतल्यास दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही : आ. सुरेश धस..
आष्टी ( दिगंबर बोडखे )
सध्याचे जीवन हे धक्का धक्कीचे आणि धावपळीचे बनले आहे माणसांना व्यायाम करायला व जेवायला देखील वेळ नाही परंतु निरोगी, आनंदी व जादा आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करून सकस आहार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.
जागतिक आरोग्य सल्लागार बाळकृष्ण जगताप व रामदास जगताप यांनी आष्टी येथे सुरू केलेल्या आरोग्यम वेल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुरेश बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक किर्तीचे आरोग्य सल्लागार अंबादास इंगळे, डॉ. निलेश ढुमणे,शाम भैय्या धस, जि. प. माजी अध्यक्ष शिवाजी राऊत,सभापती बद्रिनाथ जगताप, ॲड. आर. टी. जगताप,माजी जि.प. सदस्य सतिष शिंदे, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय ढोबळे, उपसभापती रामदास शेंडगे, विक्रम पोकळे, सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, किशोर हंबर्डे,अमोल राजे शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, कल्याण पोकळे,सरपंच बलभीम वाघमोडे उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. सुरेश धस यांनी सांगितले की, आष्टी येथे वेलनेस सेंटर सुरू होते आहे ही आनंदाची बाब आहे. वजन वाढले तर विविध आजार जडतात, चीनमध्ये जाड लोकांची संख्या कमी आहेत. आपण तीन वेळा भरपूर जेवण करतो त्यामुळे अपचन होते, पित्त व इतर आजार जडतात. सायंकाळी कमी जेवण करा व निरोगी रहा, बाळकृष्ण जगताप यांनी या क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे. हजारो लोकांना त्यांनी आरोग्य दिले आहे. मोतीलाल कोठारी विद्यालयातील शिक्षक ते पंधरा देशाचा प्रवास ही कौतुकास्पद बाब आहे. दिवसेंदिवस दवाखान्यांची संख्या वाढत चालली आहे, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.
जागतिक कीर्तीचे आरोग्य सल्लागार अंबादास इंगळे यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाने आनंदी व निरोगी जीवन जगले पाहिजे. निरोगी राहण्यासाठी वेलनेस सेंटरला यावे, कारण
माणसांची सर्वात मोठी संपत्ती आरोग्य आहे. डॉ. निलेश ढुमणे यांनी सांगितले की, मला आलेला अनुभव हिच माझी प्रेरणा आहे. मी अनेक लोकांना निरोगी राहण्यासाठी मदत केली. यशस्वी व्हायचे असेल तर आरोग्याकडे लक्ष द्यावे. आयुष्याभर निरोगी राहण्यासाठी सकस संतुलित आहाराची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जागतिक कीर्तीचे आरोग्य सल्लागार बाळकृष्ण जगताप यांनी सांगितले की, नियमित व्यायाम करावा, सकस संतुलित आहार घ्यावा, वेलनेस सेंटरच्या माध्यमातून झुम काॅलवर जाँईन व्हावे, तसेच मेडीसीन फ्रि लाईफ कसे जगायचे हे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आरोग्य सल्लागार सौ. वैशाली जगताप, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास शेंडगे, विक्रम पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, सतिश शिंदे, डॉ. शिवाजी राऊत, डॉ. संदीप उगले, डॉ. नवनीत निंबोरे, सौ. उर्मिला जगताप, रामदास जगताप, अथर्व जोगदंड, सौ. माने, भोसले तसेच बबन माने यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमास महिलासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सोबत फोटो








