पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा पत्रकार शुभम गजभिये यांची मागणी..
समीर बल्की | तालुका प्रतिनिधी चिमूर
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच पत्रकार समाधान कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना चिमूर पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्फत निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटना चिमूर तालुका अध्यक्ष शुभम गजभिये यांनी निवेदन दिले.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलबार हे पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून सक्रियपणे कार्यरत आहेत. जनतेच्या विविध प्रत्रांवर निर्भयपणे आवाज उठवत असताना त्यांच्या जीवितास काही व्यक्तींकडून धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच पत्रकार समाधान कांबळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निर्भय व युबा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर चाब असून, अशा घटनांमुळे
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा तसेच निर्भय पत्रकारितेचा प्रश्न निर्माण होतो. पत्रकारांना कोणत्याही दबावाशिवाय आपले कर्तव्य बजावता यावे, यासाठी शासन व पोलीस प्रशासनाने ठोस आणि प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे. पत्रकारांना धमकी देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या अथवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कोणताही दबाव अथवा हस्तक्षेप न ठेवता कायद्यानुसार
कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम गजभिये यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींची तातडीने चौकशी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
पत्रकार समाधान कांबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सखोल, निष्पक्ष व पारदर्शक तपास करून तपास हल्ल्यातील सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, पत्रकारांना धमकी, मारहाण किंवा जीवितास धोका निर्माण करणाऱ्या घटनांची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात यावेत. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी चंद्रपुर, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांना देण्यात आलेल्या आहेत.








