एकाच रात्री ३ ठिकाणी चोरी, चाकूचा धाक दाखवून केले लाखो रुपयाचे ऐवज लंपास..
लाखो रुपयाचे सामाना सह रोख रक्कमेची झाली चोरी !
बातमी सम्राट | चंदन जंजाळ | बाळापूर अकोला | दि.२२/०९/२६/
बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथे रविवार दि २० सप्टे रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी श्री जागेश्वर शिक्षक कॉलनी आणि पल्हाडे लेआउट मधील सचिन लोखंडे यांच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयाचे ऐवज व रोख रक्कम घेऊन चोरटे प्रसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिडलेल्या माहितीनुसार चोरटे हे जागेश्वर शिक्षक कॉलनी मधील शिंदे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाल्याचे फुटेज मध्ये चोरटे दिसून येत आहेत तर सचिन लोखंडे यांच्या घरातील आत मधल्या खोलीचा लाथिने दरवाजा तोडून घरातील लोकांना पोटाला चाकू लावून कपाटा मधील सर्व दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पडून गेल्याची माहिती मिळताच दि 21 सप्टेंबर रोजी श्वान पथकाला प्राचार्य करण्यात आले होते श्वान पथकाच्या हाती चोराने वापरलेली रुमाल व अन्य काही वस्तू हस्तगत करून श्वान पथक रावांना झाले तर आठवडी बाजारातून ३ मोबाईल चोरीला गेल्याची घटणा घटली व तामशी येथील शेतकर्याच्या शेतातील शेती उपयोगी अवजारे पावर विंडर अंदाजे किमंत ५०,००० रुपये असलेली यंत्रना चोरून घेल्याची फिर्याद बाळापूर पोस्टेला दाखल करण्यात आली. तर अकोला आलेले पीएसआय गायकवाड हेडकॉन्स्टेबल चव्हाण, श्वान किबा, वाहनचालक प्रशांत जंजाळ तर वाडेगाव पोलीस चौकीचे जमदार प्रशांत डोईफोडे पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला तर पुढील तपास ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदशनात पोलिस 3 उपनिरीक्षक विनोद खाडे, ए एस आय सुरेश ढोरे, पोलिस कर्मचारी मुळे तपास करीत आहेत.








