पेरलेले पिक करपल्या मुळे ३६ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !
बातमी सम्राट | चंदन जंजाळ | बाळापूर अकोला | दि.२२/०९/२६/
बाळापूर | पावसाने दिड महीना दांडी मारल्याने तालुक्यातील खरीप पिक करपली त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तर वाडेगाव परिसरात पिक पाण्या अभावी दिवसान दिवस करपत चालली आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत लावलेल्या खर्च सुद्धा निघत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
शेतीमध्ये आपल्या मेहनतीचा पैसा लावून मोठ्या प्रमाणात मशागत करून पीक हातात येत नसल्याचे पाहून वाडेगाव येथील 36 वर्षीय युवक लक्ष्मण रामभाऊ इंगळे या युवकाने आपल्या राहत्या घरी दि २० सप्टे रोजी रात्री ९ वाजत गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या पश्चात २ मुली आई वडील आसा परिवार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे तालुक्यासह परिसरात शेतकऱ्या विषयी चिंता व्यक्त केले जात आहे अल्पभूधारक शेतकरी पुत्र असलेला लक्ष्मण आई-वडिलांच्या म्हातारपणाचा सहारा या नापिकीमुळे बळी गेल्याचा परिसरात बोलले जात आहे.
सतत दीड महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने झालेल्या पिकाची नुकसान लक्षात घेता सरकारने लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा की असे शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहता काय असाही प्रश्न वाडेगाव परिसरातील शेतकरी विचारत आहेत त्यामुळे सरकारने शेतकऱ्याची व्यथा लक्षात घेऊन यावर गांभीर्यपूर्वक विचार करून पुन्हा कोणी लक्ष्मण सारखी गड पास घेऊन आत्महत्या करणार नाही एवढीच अपेक्षा तालुक्यासहस परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.








