दुष्काळ जाहीर करण्यात यावा , विकास जपे यांची प्रशासनाकडे मागणी.
बातमी सम्राट | राजेंद्र दुनबळे | शिर्डी प्रतिनिधी | दि.२२/०९/२६/
शिर्डी परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे शासनाने संबंधित भागात तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी . ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक सावळी विहीर गावचे मा. उपसरपंच विकास जपे यांनी केली आहे
दुष्काळजन्य परिस्थिती संपूर्ण भागत झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
अनेक ठिकाणी विद्युत डीपी नादुरुस्त अवस्थेत आहे तर अनेक ठिकाणच्या विद्युत डीपी ह्या बऱ्याच दिवसापासून बंद आहे कमी क्षमतेचे ट्रांसफार्मर असल्याने विद्युत डीपी मधून विद्युत प्रवाह सुरळीत होत नाही त्यामुळे विद्युत मोटारी बंद अवस्थेत आहेत.
पावसा अभावी पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्यात येणार असल्याचेही शेतकरी व ग्रामस्थ यांच्यावतीने सांगण्यात आले आहे .








