मोहपूर येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना ; अध्यक्षपदी संजय हटकर !
बातमी सम्राट | मार्कंडेय सिरामवार | किनवट तालुका प्रतिनिधी | दि.२२/०९/२६/
किनवट : मोहपूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मोहपूर येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी संजय गंगाराम हटकर, तर उपाध्यक्षपदी सौ. रोहिणी मारुती दवणे यांची निवड करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सुवर्णा देविदास आमले, प्रदीप वसंतराव सोनटक्के, भगवान तुकाराम चिरंगे, सोनूताई लक्ष्मण मानतुटे, सीमा मारुती हजारे, अंकुश देविदास सोनटक्के, रेणुका मारुती मुकाडे, स्वाती अमोल माने, सय्यद परवेस सय्यद अब्दुल, प्रवीण प्रकाश सोनटक्के यांची निवड करण्यात आली.
तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून संघरत्न सखाराम घुले, सुनील विठ्ठल भिसे, वंदना किसन भिसे, नारायण शंकर बोथिंगे, सविता विजय खुडे, शिवाजी शिवराम तांबारे, प्रभू दशरथ बोथिंगे, सगुना अनिल वंजारे यांची निवड झाली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. वैष्णवी बालाजी खुडे आणि चि. रोशन रामदास खराटे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सुवर्णा देविदास आमले, पोलीस पाटील प्रदीप सोनटक्के, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भगवान चिरंगे, केंद्रप्रमुख पद्माकर कवटिकवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन नरवाडे, शिक्षक ग. नु. जाधव, रवी चौधरी, अमोल सुकलवाड, गजानन राठोड तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मारोती हापसे, सागर आमले आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.








