टाकळीभान येथे शॉर्ट सर्किट मुळे उसाला लागली भीषण आग !
बातमी सम्राट | टाकळीभान प्रतिनिधी |-संदीप जाधव |दि.२६/०९/२६/
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बेलपिंपळगाव रस्त्यालगत असणार्या(बल्हई नाला)परिसरात ऊस पिकात भयाण अग्नितांडव..
या बाबतची अधिक माहिती अशी की टाकळीभान येथील शेतकरी स्मिता सचिन मगर यांच्या गट नंबर 429 मध्ये असणाऱ्या सुमार तीन ते चार एकर क्षेत्रावरील उसाच्या पिकाला मेन लाईनच्या झालेल्या शाॅर्ट सर्कीटमुळे आग लागली. या लागलेल्या आगीमुळे तब्बल तीन एकर उसाचे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. श्रीरामपूर नगरपालीकेचे अग्नीशमन दलाची गाडी यावेळी घटनास्थळी आली मात्र तोपर्यंत आसपासच्या शेतकर्यांनी अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणली. ही घटना शुक्रवार दि.२५ रोजी भरदुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.तीन एकर खोडवा उस पीक शेतातून जाणार्या महावितरणच्या मेन लाईनच्या तारांचे वार्यामुळे व तारांना असणार्या झोळामुळे स्पार्कींग झाले. परिणामी पडलेल्या जाळाच्या लोळामुळे व उन्हाच्या चटक्यामुळे क्षणार्धात उसाने पेट घेतला. ही बाब येथील शेजारी असणार्या येवले वस्तीवरील शेतकर्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरीत ही बातमी उस मालकाला दिली. मात्र वार्याचा प्रचंड वेग असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. बघता बघता शंभर ते दिडशे शेतकर्यांचा जनसमुदाय यावेळी आग विझविण्यासाठी या ठिकाणी जमा झाला. यावेळी अशोक सहकारी साखर कारखान्याची अग्नीशमन गाडी उपल्बध व्हावी म्हणून कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता गाडी उपल्बध नसल्याचे सांगण्यात आले. तद्नंतर श्रीरामपूर नगरपालीकेच्या अग्नीशमन दलाशी संपर्क साधला असता. नगरपालीकेची अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र तोपर्यंत उपस्थित आसपासच्या शेतकर्यांनी मोठ्या शिताफिने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. उन्हाचा तडाखा व प्रचंड वारा यामुळे आगीच्या ज्वाळा जवळ येवू देत नव्हत्या. अशा परिस्थितीतही अथक परिश्रम करत शेतकर्यांनी ही आग आटोक्यात आणली. सात एकर क्षेत्रापैकी सुमारे चार एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवले असून तीन एक क्षेत्र वाचविण्यात यश नाही आले. उपस्थित शेतकर्यांच्या प्रसंगवधनामुळे आसपास असणार्या इतर शेतकर्यांचे उस पिके या आगीपासून वाचले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासनाने पाहणी करून प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला.
सदर आग आटोक्यात आणण्यासाठी विकास मगर, सुभाष येवले, ज्ञानदेव येवले, विठ्ठल येवले, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, लक्ष्मण सटाले, शरद सटाले, भागवत रणनवरे, ऋषभ मगर, निलेश मगर, आदित्य मगर, शुभम शेळके, महेंद्र शेळके, द्वारकानाथ बोडखे, विलास बोडखे, रणजित मगर, अमित सटाले, स्वागत सटाले, किरण गायकवाड, अमोल हुळहुळे, बापू साळूंखे, विशाल साळूंखे, स्वप्निल थोरात, बोंबले, गणेश शेरकर, पवन मगर, काका मोरे, बाळू साठे, विनोद मगर आदीसह इतर शेतकर्यांनी अथक परिश्रम घेतले. सध्या ठिकठिकाणी विद्युत तारांना झोळ असल्यामुळे शाॅर्ट सर्कीटचे प्रमाण वाढत आहे. तरी महावितरणणे याकडे लक्ष देवून विद्युत तारांचे काम करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.








